भयंकर! विमानाने उड्डाण भरताच इंजिनला लागली आग; थरारक घटनेचा VIDEO व्हायरल

दिल्ली विमानतळावरून एक थरारक घटना समोर आली. दिल्लीहून बेंगळुरूला जाणाऱ्या इंडिगोच्या दिल्ली-बेंगळुरू विमानाला अचानक आग लागली.
Delhi To Bangalore Flight
Delhi To Bangalore FlightSaam TV
Published On

नवी दिल्ली : दिल्ली विमानतळावरून एक थरारक घटना समोर आली. दिल्लीहून बेंगळुरूला जाणाऱ्या इंडिगोच्या दिल्ली-बेंगळुरू विमानाला अचानक आग लागली. खिडकीतून इंजिनला आग लागल्याचे पाहून विमानात बसलेल्या प्रवाशांना धक्काच बसला. विमान टेक ऑफ करत असतानाच ही घटना उघडकीस आली. या विमानातून १८४ प्रवाशी प्रवास करीत होते.

Delhi To Bangalore Flight
Wardha News : पुलाच्या कठड्यात बस अडकली; थरारक बस अपघातातून 40 प्रवासी बचावले

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीहून बेंगळुरूला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइट (6E-2131) ही आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच विमानाची दिल्ली विमानतळावर सुरक्षित लँडिंग (Emergency Landing) करण्यात आली. विमानातील सर्व प्रवाशांना विमानातून सुखरूप बाहेर काढण्यात आले असून आग विझवण्यात आली.

या घटनेनंतर इंडिगोकडून एक निवेदन काढण्यात आले असून यामध्ये विमानातील सर्व प्रवाशी सुखरूप असल्याची माहिती देण्यात आली आहे. दुसरीकडे दिल्ली विमानतळ प्रशासनाकडून अपघाताची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. विमानाच्या इंजिनला आग नेमकी कशामुळे लागली? याची माहिती अद्यापही गुलदस्त्यात आहे.

नेमकं काय घडलं?

नेहमीप्रमाणे दिल्लीहून बंगळुरूला जाणारं विमान धावपट्टीवर आलं. प्रवासी बसल्यानंतर उड्डाण भरण्यासाठी धावपट्टीवर धाव घेतली. मात्र, अचानक एक ठिणगी उड़ाली आणि त्यानंतर भीषण आग लागली. विमानाच्या इंजिनला आग लागल्याचं काही प्रवाशांना कळालं. आरडाओरड झाल्यानंतर वैमानिकाने तातडीने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्याचा निर्णय घेतला.

याची माहिती विमानतळ प्रशासनाला कळवण्यात आली. विमानाने वेळेवर लँडिंग केल्याने मोठा अनर्थ टळला. इंडिगोने यासंदर्भात माहिती दिली आहे. सध्या सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं असून हे विमान पुन्हा कधी उड्डाण करू शकेल याबाबत अद्याप कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com