New Delhi News : दिल्ली सरकारच्या नव्या अबकारी धोरणातील कथित घोटाळा प्रकरणात ईडीने (ED) शनिवारी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या स्वीय सहायकाच्या घरावर छापा मारला. ईडीने सिसोदिया यांच्या पीएला अटक केली आहे. याबाबतची माहिती स्वतः मनीष सिसोदिया यांनी ट्विटद्वारे दिली आहे.
यावेळी मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. खोटा एफआयआर करून माझ्या घरावर छापे मारण्यास सांगितले. बँकेच्या लॉकरची झडती घेतली. माझ्या गावात तपास केला. मात्र, माझ्याविरोधात त्यांना काहीही मिळालं नाही. आज यांनी माझ्या पीएच्या घरावर छापा मारला. तेथेही काही सापडलं नाही. त्यामुळे आता त्यांना अटक केली आहे. भाजपवाल्यांना निवडणुकीत पराभव होण्याची एवढी भीती, असं सिसोदिया म्हणाले.
सिसोदिया यांनी एका अन्य ट्विटमध्ये भाजपवर गंभीर आरोप केले. महापालिका निवडणूक आणि गुजरातमध्ये मोठा पराभव होईल या भीतीने भाजपने (BJP) तिहार जेलमध्ये कैद असलेल्या एका ठगासमवेत डील केली आहे. तो रोज केजरीवाल यांच्याविरोधात तथ्यहीन आरोप करेल आणि त्या बदल्यात भाजप त्याला या प्रकरणात मदत करेल. पुढच्या आठवड्यात जे. पी. नड्डा हे त्याला भाजपमध्ये प्रवेश देतील असे मी ऐकले आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.