Delhi Kanjhawala Accident Case : दिल्लीतील अपघात प्रकरणी मोठी कारवाई; 11 पोलीस सस्पेंड

Delhi Kanjhawala Accident Case Latest : दिल्लीतील कंझावाला अपघात प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे.
Sultanpuri Delhi Case
Sultanpuri Delhi Case Saam Tv
Published On

Delhi Kanjhawala Accident Case Latest : दिल्लीतील कंझावाला अपघात प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. रोहिणी जिल्ह्यात तैनात पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईची कुऱ्हाड कोसळली आहे. ११ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

तरुणीला कारने १२ किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्यानंतर तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात रोहिणी जिल्ह्यात तैनात असलेल्या ११ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. सर्व निलंबित पोलीस कर्मचारी हे घटनेच्या रात्री पीसीआरमध्ये तैनात होते. पोलिसांनी अहवाल सादर केल्यानंतर गृहमंत्रालयाकडून कारवाईचे आदेश देण्यात आले होते.

याआधी गृहमंत्रालयाने दिल्ली पोलीस (Delhi Police) आयुक्त संजय अरोरा यांना तीन पीसीआर व्हॅनमध्ये तैनात सर्व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे निर्देश दिले होते. कंझावाला प्रकरण (Kanjhawala Accident Case) आणि निष्काळजीपणा केल्यामुळे ११ पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

निलंबित करण्यात आलेले सर्व पोलीस कर्मचारी हे रोहिणी जिल्ह्यात तैनात होते. कंझावाला परिसरातील सुरक्षा व्यवस्थेची त्यांची जबाबदारी होती. तरुणीला कारने फरफटत नेल्यानंतर तिचा मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता.

आरोपपत्र दाखल करण्याचेही निर्देश

या प्रकरणात लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्याचे निर्देश गृहमंत्रालयाने दिल्ली पोलिसांना दिले होते. या प्रकरणातील दोषींना शिक्षा व्हावी यासाठी हे आदेश दिले आहेत. चौकशी संथगतीने व्हायला नको तसेच चौकशी कुठपर्यंत आली याबाबतचा अहवाल गृहमंत्रालयाला आठवड्याला पाठवण्यात यावा, असेही आदेश आहेत.

दिल्लीतील तरूणी दुचाकीवरून रात्री घरी जात असताना एका कारने धडक दिली होती. त्यानंतर दुचाकीवरील तरुणी कारमध्ये अडकली. कारमधील आरोपींनी तिला १२ किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. त्यात तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात कारमधून प्रवास करणारे पाच जण आणि त्यांच्या साथीदारांना अटक करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com