Baba Ramdev: बाबा रामदेव यांना हायकोर्टाचा दणका; पंधरा दिवसात मागे घ्यायला लावलं कोरोनाच्या औषधावरील दावा

Baba Ramdev: योगगुरू बाबा रामदेव यांना पुन्हा एकदा न्यायालयाने दणका दिलाय. बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांना ‘कोरोना’वर उपचार म्हणून ‘कोरोनिल’चा प्रचार केला होता तो दावा मागे घेण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने सांगितलंय.
Baba Ramdev: बाबा रामदेव यांना हायकोर्टाचा दणका; पंधरा दिवसात मागे घ्यायला लावलं  कोरोनाच्या औषधावरील दावा
Baba Ramdev Latest NewsSaam Tv
Published On

योगगुरू बाबा रामदेव यांना न्यायालयाने पुन्हा एकदा दणका दिलाय. दिल्ली उच्च न्यायालयाने रामदेव बाबा आणि आचार्य बाळकृष्ण यांनी सोशल मीडियावर कोरोनाच्या औषधाविषयी केलेला दावा मागे घेण्यास सांगितलं आहे. बाबा रामदेव यांनी येत्या १५ दिवसात आपला दावा मागे घ्यावा असं न्यायालाने सांगितलंय. या दाव्यात 'कोरोनिल' हा कोरोनावरील औषध असल्याच म्हटलं होतं. यासोबतच ॲलोपॅथीच्या परिणामाबाबत सांगितलेल्या गोष्टीही मागे घेण्यास सांगितलं आहे. न्यायालयाने त्यांना १५ दिवसांत आपला दावा मागे घेण्यास सांगितले आहे.

डॉक्टरांच्या संघटनांच्या याचिकेवर निर्णय देताना दिल्ली उच्च न्यायालयाने बाबा रामदेव यांना खडेबोल सुनावलेत. न्यायमूर्ती अनुप जयराम भंभानी यांच्या खंडपीठाने निर्णय देताना सांगितले की, 'मी अर्ज मंजूर करत आहे. मी काही मजकूर, पोस्ट काढून टाकण्यास सांगितले आहे. मी बचाव पक्षाला तीन दिवसांत ते काढून टाकण्यास सांगितले आहे.

अन्यथा मी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला तसे करण्याचे निर्देश दिलेत. दरम्यान न्यायमूर्ती अनुप जयराम भंभानी यांनी पक्षकारांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर २१ मे रोजी निर्णय राखून ठेवला होता. दिल्ली मेडिकल असोसिएशनने (डीएमए) दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने हे आदेश दिलेत. रामदेव यांच्या कंपनीने कोरोनिल किटबद्दल खोटे दावे केलेत.

कोरोनिल हे कोरोना रोगावर उपचार करणारे औषध असल्याचा दावा केला. परंतु हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे औषधचा परवाना देण्यात आला होता. रामदेव यांचा दावा खोटा प्रचार करणारा आहे. कोरोनिलसह त्यांच्या उत्पादनांची विक्री वाढविण्यासाठी मार्केटिंग पॉलिसी होती. जेणेकरून कोरोनिलचा विक्री वाढेल, असं याचिकेत म्हटलंय.

याआधी सर्वोच्च न्यायालयाने पतंजली आणि इतर कंपन्यांशी संबंधित दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले होते. न्यायालयाने वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावर जाहिराती प्रसिद्ध करण्यासंदर्भात अटी घातल्या. आता जाहिरातदाराला प्रसारमाध्यमांमध्ये कोणतीही जाहिरात प्रसारित करण्यापूर्वी किंवा प्रकाशित करण्यापूर्वी सेल्फ डिक्लेरेशन देण्यास सांगितले. त्याशिवाय कोणतीही जाहिरात प्रकाशित किंवा प्रसारित केली जाणार नसल्याचं कोर्टाने म्हटलं होतं.

Baba Ramdev: बाबा रामदेव यांना हायकोर्टाचा दणका; पंधरा दिवसात मागे घ्यायला लावलं  कोरोनाच्या औषधावरील दावा
Baba Ramdev : बाबा रामदेव यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; प्रसिद्ध माफीनाम्यावर समाधान व्यक्त

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com