Money Laundering Case: केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (CBI) WAPCOS चे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (CMD) राजिंदर कुमार गुप्ता आणि त्यांचा मुलगा गौरव यांना अटक केली आहे. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी ही अटक करण्यात आली.
यासोबतच सीबीआयने १९ ठिकाणी शोधमोहीम राबवली, ज्यात ३८ कोटींहून अधिक रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. WAPCOS पूर्वी 'वॉटर अँड पॉवर कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड' म्हणून ओळखली जात होती. हा सरकारी मालकीचा केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. याचे प्रशासकीय नियंत्रण जलशक्ती मंत्रालयाकडे (Ministry of Jal Shakti) आहे.
सीबीआयने गुप्ता, त्यांची पत्नी रीमा, मुलगा गौरव आणि सून कोमल यांच्याविरुद्ध चुकीच्या मार्गाने पैसे कमावल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता. हा भ्रष्टाचार १ एप्रिल २०११ ते ३१ मार्च २०१९ या काळात ते पदावर असताना झाला होता, असं सांगण्यात येत आहे. (Latest Marathi News)
याप्रकरणी मंगळवारी छापा टाकण्यात आला. एफआयआर नोंदवल्यानंतर सीबीआयच्या पथकांनी दिल्ली, गुरुग्राम, चंदीगड, सोनीपत आणि गाझियाबादमधील १९ ठिकाणी छापे टाकले. या छाप्यांमध्ये अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली.
मंगळवारी टाकलेल्या छाप्यांमध्ये सीबीआयला २० कोटी रुपयांची रोकड सापडली, जी बुधवारी ३८ कोटींहून अधिक झाली, असे सीबीआयच्या प्रवक्त्यांनी सांगितले. रोख रक्कम, दागिने, मौल्यवान वस्तू आणि मालमत्तेची कागदपत्रे याशिवाय जप्त करण्यात आल्याचे प्रवक्त्यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.