Delhi Building Collapsed : दिल्लीतील कल्याणपुरी परिसरात ३ मजली इमारत कोसळली

Delhi Building Collapsed News : दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. कल्याणपुरी परिसरातील ३ मजली इरारती ३ सेकंदात कोसळली. इमारत कोसळल्यानंतर परिसरात धुळीचे लोट पसरले होते, मात्र कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.
Delhi Building Collapsed
Delhi Building CollapsedSaam Digital

दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. कल्याणपुरी परिसरातील ३ मजली इरारती ३ सेकंदात कोसळली. इमारत कोसळल्यानंतर परिसरात धुळीचे लोट पसरले होते, मात्र कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.

सध्या घटनास्थळी पोलिसांचे पथक आणि इतर मदत पथके हजर आहेत. सर्व इमारतींमधील मलबा हटवण्याचे काम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल्यापुरी येथील ब्लॉक-15 मध्ये असलेली इमारत दोन दिवसांपूर्वी रिकामी करण्यात आली होती. ही इमारत हळूहळू झुकत होती. त्यामुळे पोलिसांनी इमारत रिकामी करून बॅरिकेड लावले होते. पण, शनिवारी दुपारी इमारत आपोआप कोसळली.

Delhi Building Collapsed
Nestle News: सावधान! नेस्ले मुलांच्या आरोग्याशी खेळतेय का? बेबी फूडमध्ये भेसळ? मॅगीनंतर सेरेलॅक उत्पादन वादात

गेल्या महिन्यात मार्चमध्ये दिल्लीतील वेलकम परिसरात असाच एक अपघात झाला होता. जुनी बांधकामाधीन दुमजली इमारत कोसळल्याने 2 जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. दुमजली इमारतीच्या तळमजल्यावर जीन्स कटिंगचे काम सुरू होते, तर पहिला मजला रिकामा असल्याचे सांगण्यात येत होते. वेलकमच्या कबीर नगर भागात हा अपघात झाला होता.

Delhi Building Collapsed
Delhi News : दोन मुलं मृतावस्थेत,आई रक्ताच्या थारोळ्यात; दिल्लीतील शशी गार्डन परिसरात नेमकं काय घडलं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com