Pollution: देश गुदमरतंय! २० सर्वात प्रदूषित शहरांपैकी १३ शहरं भारतात, कोणतं शहर पहिल्या क्रमांकावर?

Indian cities with worst air quality: जगातील टॉप २० प्रदूषित शहरांपैकी १३ शहरं ही भारतात आहेत. प्रदूषणा घट झाली नाही तर, आरोग्य आणखी बिघडत जाईल.
Mumbai Pollution
Mumbai PollutionSaam Digital
Published On

प्रदूषणामध्ये सध्या वाढ होत आहे. इंडस्ट्री आणि वाढत्या बांधकामांमुळे शहरातील हवा अशुद्ध होत चालली आहे. जगातील २० सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी १३ शहरे भारतातील असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातील आसाममधील बुरनिहाट हे शहर अव्वल स्थानावर आहे.

स्विस एअर क्वालिटी टेक्नॉलॉजी कंपनी आयक्यूएअरने जारी केलेल्या वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्टनुसार, २०२४ मध्ये दिल्ली ही जागतिक स्तरावर सर्वात प्रदूषित राजधानी आहे.

जगातील टॉप २० प्रदूषित शहरांपैकी १३ शहरं ही भारतात आहेत. ज्यात बर्निहाट, दिल्ली, मुल्लापूर, फरिदाबाद, लोणी, नवी दिल्ली, गुरगाव, गंगानगर, ग्रेटर नोएडा, भिवाडी, मुझफ्फरनगर, हनुमानगड आणि नोएडा यांचा समावेश आहे.

प्रदूषणामुळे आरोग्याला गंभीर धोका

भारतात वायू प्रदूषणामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होतात. ज्यामुळे आपलं आयुष्य ५.२ वर्षांनी कमी होऊ शकतं. गेल्या वर्षी प्रकाशित झालेल्या लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ अभ्यासानुसार, २००९ ते २०१९ पर्यंत, भारतात दरवर्षी प्रदूषणामुळे सुमारे १५ लाख नागरीकांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com