Husband Ends Life Due to Wife's Abuse in Hubli : अतुल सुभाष याच्यासारखं आणखी एक प्रकरण समोर आलेय. हुबळीमधील चामुंडेश्वरी नगरात एका व्यक्तीने बायकोच्या जाचाला कंटाळून आयुष्य संपवलेय. टोकाचा निर्णय घेण्याआधी त्यानं नोट लिहून ठेवली होती. त्यामध्ये त्याने आयुष्य संपवण्याचे कारण सांगितले होते. हुबळीमध्ये या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. बायकोच्या जाचाला कंटाळून आय़ुष्य संपवणाऱ्या तरूणाचे नाव पीटर असे आहे.
कर्नाटकातील हुबळीमधील चामुंडेश्वरी नगरमध्ये अतुल सुभाष याच्यासारखीच हृदय विदारक घटना घडली आहे. पीटर नावाच्या एका व्यक्तीने सुसाइड नोट लिहून आत्महत्या केली. पत्नी पिंकीच्या छळाला कंटाळून आयुष्य संपवत असल्याचे त्याने म्हटलेय. पीटरने वडिलांची माफीही मागितली आहे.सॉरी डॅडी, तिला माझा मृत्यू हवाय, असे पीटरने पोस्टमध्ये म्हटलेय.
बायकोच्या जाचाला कंटाळून आयुष्य संपवलं -
पीटर एका खासगी कंपनीत कामाला होता. वैवाहिक आयुष्यात पीटर खूश नव्हता. बायकोसोबत त्याचे नेहमीच मतभेद व्हायचे, दोघांमध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टींमुळे खटके उडायचे. सततच्या त्रासाला कंटाळून पीटरने टोकाचा निर्णय घेतला. पीटरच्या कुटुंबियांनी सूनेवर गंभीर आरोप केले आहेत. कुटुंबाने पीटरची पत्नी पिंकीवर गंभीर आरोप केलाय.पिंकी पीटरचा मानसिक आणि भावनिक छळ करायची. तिने पीटरपासून घटस्फोटासाठी अर्ज केला होता आणि 20 लाख रुपये पोटगी म्हणून मागितले होते.
पीटरने आयुष्य संपवण्याआधी एक नोट लिहिली होती. ती पोलिसांना मिळाली आहे. पीटरच्या सूसाइड नोटमध्ये बायकोवर आरोप करण्यात आलाय. पत्नी मला मारून टाकेल, तिला मी नकोय. मला टॉर्चर सहन होत नसल्यामुळे मी आयुष्य संपवत आहे. पीटरने आपल्या घरात गळफास घेत आयुष्य संपवले. पीटरच्या निधानंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. पीटरच्या वडिलांनी सूनेवर गंभीर आरोप केलेत. पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.