Mumbai Weather Forcast: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ येणार, मुंबई-गुजरातमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Rain News: 23 ते 27 मे दरम्यान ओडिशा, महाराष्ट्र, गुजरातमध्ये या चक्रीवादळाचा परिणाम होणार आहे. या चक्रीवादळामुळे 28 मे रोजी गुजरात आणि मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
IMD Alert For Mumbai: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ येणार, मुंबई-गुजरातमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
Heavy Rainfall in Mumbai And Gujarat At 28 May Due To Cyclone Storm In Bay Of BengalSaam TV

भारताला चक्रीवादळाचा (Cyclone) धोका निर्माण झाला आहे. बंगालच्या उपसागरामध्ये (Bay Of Bengal) कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन त्याचे रुपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात 23 मे पर्यंत तीव्र चक्रीवादळाची शक्यता आहे. 23 ते 27 मे दरम्यान ओडिशा, महाराष्ट्र, गुजरातमध्ये या चक्रीवादळाचा परिणाम होणार आहे. या चक्रीवादळामुळे 28 मे रोजी गुजरात आणि मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या तुफान अवकाळी पाऊस पडत आहे. वादळी वाऱ्यासह पडत असलेल्या या पावसामुळे अनेक भागांमध्ये शेतपिकांचे आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेल्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. अशामध्ये आता राज्यात आज देखील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपिट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

IMD Alert For Mumbai: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ येणार, मुंबई-गुजरातमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
Mumbai-Ahmedabad Expressway Accident : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कंटेनरचा अपघात

आज सोलापूर, कोल्हापूर, जालना, सिंधुदुर्ग, बुलडाणा, धाराशिव, लातूर, हिंगोली, अकोला, अमरावती, वाशीम, अहमदनगर, सांगली, बीड, नांदेड, परभणी या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असून या ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. वादळी वाऱ्यासह हा पाऊस पडणार असल्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना आणि शेतकऱ्यांनी शेतामध्ये काम करत असताना काळजी घ्यावी असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

IMD Alert For Mumbai: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ येणार, मुंबई-गुजरातमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
Maharashtra Weather Forecast: काळजी घ्या! आजही अवकाळीचा इशारा कायम, विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com