मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज म्हणाले; गाय, गोमूत्र आणि शेण देशाची अर्थव्यवस्था मजबूत करु शकतात

गायीचे शेण आणि मूत्राचा वापर करून, देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली जाऊ शकते, असे मत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केले
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज म्हणाले; गाय, गोमूत्र आणि शेण देशाची अर्थव्यवस्था मजबूत करु शकतात
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज म्हणाले; गाय, गोमूत्र आणि शेण देशाची अर्थव्यवस्था मजबूत करु शकतातSaam Tv

वृत्तसंस्था : गायीचे शेण आणि मूत्राचा वापर करून, देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली जाऊ शकते, असे मत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केले आहे. भोपाळमध्ये भारतीय पशुवैद्यकीय संघटनेच्या महिला शाखेच्या अधिवेशनात संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे. जर योग्य व्यवस्था यासाठी अवलंबविली तर गायी, तिचे शेण आणि मूत्र देश आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला चांगलीच बळकट करण्यास मदत करू शकणार आहे, असे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी यावेळी म्हणाले आहे.

हे देखील पहा-

मध्य प्रदेशामध्ये हिंदुत्वासंबंधी अनेक गोष्टींना सरकारी पातळीवरुन समर्थन मिळत असल्यामुळे नेहमी दिसून येतच असते. याचाच एक प्रत्यय आता मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या एका वक्तव्यातून येत आहे. शनिवारी त्यांनी असे विधान केले आहे की, गाय आपल्या शेण आणि मूत्रासह देशाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावू शकणार आहे.

सिंह हे भोपाळमध्ये भारतीय पशू चिकित्सा संघाच्या महिला समेंलनामध्ये संबोधित करत होते. तेंव्हा ते म्हणाले की, गायी शिवाय बैलाची अनेक कामे होऊ शकत नाही. म्हणून, ती खूपच महत्त्वाची ठरणार आहेत. जर योग्य व्यवस्था साकारली गेली तर गाय, तिचे शेण आणि तिचे मूत्र राज्य आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला अधिक मोठ्या प्रमाणात मजबूत करण्यामध्ये मदत करु शकणार आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज म्हणाले; गाय, गोमूत्र आणि शेण देशाची अर्थव्यवस्था मजबूत करु शकतात
धक्कादायक; नक्षलवाद्यांनी एकाच कुटुंबातील चौघांना फासावर लटकवले

याकरिता आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. तसेच या भागात महिलांच्या योगदानामुळे मला असा विश्वास आहे, की आपण यशस्वी होऊ. गोबर आणि गोमूत्रापासून आपण अनेक महत्त्वाचे पदार्थ तयार करु शकणार आहे, ज्यामध्ये किटकनाशकांपासून ते औषधांचा समावेश आहे. देशातील पहिले गौ अभयारण्य मध्य प्रदेशात असल्याचा दावा केला जात आहे. ज्याचे उद्घाटन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले होते.

मागील वर्षी राज्यामध्ये भाजप सरकारने ६ विभागांच्या मंत्र्यांबरोबर एका गौ कॅबिनेटच्या स्थापनेची देखील घोषणा केली होती. यामुळे राज्यात गायीचे संरक्षण आणि गायीचे उत्पादन वाढवण्याकरिता कार्य केले जाणार आहे. मध्य प्रदेशच्या २०१८ च्या विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये देखील गायीवर अधिक जोर देण्यात आला होता. यामध्ये प्रत्येक गावात गौशाळा बांधण्याचे तसेच गोमूत्राचे व्यावसायिक उत्पादन सुरु करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com