कोरोनाचे औषध म्हणून दिले 'विष', तिघांचा मृत्यू

देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही आता ३ कोटींवर पोहचली आहे. लाखो लोकांना आपला जीव गमवावे लागले आहे
कोरोनाचे औषध म्हणून दिले 'विष', तिघांचा मृत्यू
कोरोनाचे औषध म्हणून दिले 'विष', तिघांचा मृत्यूSaam Tv
Published On

नवी दिल्ली - देशातील कोरोनाबाधित Corona रुग्णांची संख्या ही आता ३ कोटींवर पोहचली आहे. लाखो लोकांना आपला जीव गमवावे लागले आहे. देशात कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना, अनेक भयंकर घटना समोर येत आहेत. तामिळनाडू मध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. Covid 19 cure pills given family erod three dead

कोरोना औषधाच्या नावाखाली विषाच्या गोळ्या दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याध्ये ३ जणांचा मृत्यू dead झाल आहे. एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. कर्ज घेतलेल्या, पैशांमुळे ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. विषबाधा झालेल्या, कुटुंबाने एका व्यक्तीला कर्ज दिल होत, जेव्हा कुटुंबाने पैशाची मागणी केली होती. त्यावेळेस त्याने हे कृत्य केल आहे. आलेल्या माहितीनुसार, तामिळनाडू Tamil Nadu येथील इरोड Erode मध्ये ही घटना घडली आहे.

हे देखील पहा-

करुप्पनकाउंडर (वय-७२) यांनी काही दिवसांपूर्वी आर कल्याणसुंदरम या नावाच्या व्यक्तीला १५ लाख रुपये दिल होत. करुप्पनकाउंडर यांना गरज असल्याने, कल्याणसुंदरमकडे पैसे परत मागितले होते. पैशांची परतफेड करू न शकल्याने, कल्याणसुंदरम यांनी करुप्पनकाउंडर आणि त्याच्या कुटुंबाला Family संपवण्याचा कट रचला आहे. कल्याणसुंदरम यांनी सबरी नावाच्या व्यक्तीसोबत १ योजना आखली होती. यामध्ये साबरी यांना आरोग्य विभागाचा Department of Health कर्मचारी बनवून करुप्पनकाउंडर यांच्या घरी पाठविण्यात आले आहे. Covid 19 cure pills given family erod three dead

२६ जून दिवशी तिथे जाऊन सबरीने करुप्पनकाऊंडरला विचारले होते की, कुटुंबातील कोणालाही खोकला, सर्दी इ. आजार आहे का? यानंतर सबरीने जाता- जाता काही विषाच्या गोळ्या Tablets करुप्पनकाऊंडर जवळ दिले होते. यावेळी सबरीने रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी, हे औषध असल्याचे सांगितले आहे. सबरी गेल्यानंतर करुप्पनकाऊंडर, त्यांची पत्नी, मुलगी आणि घरात काम करणाऱ्या एका महिलेने त्या गोळ्या घेतले. नंतर ते चौघेही बेशुद्ध अवस्थेत पडले, शेजार्‍यांनी तातडीने त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल होते.

कोरोनाचे औषध म्हणून दिले 'विष', तिघांचा मृत्यू
उंदराने डोळे कुरतडलेल्या तरूणाचा अखेर मृत्यू

करुप्पनकाऊंडरची पत्नी मल्लिका, मुलगी दीपा व घरात काम करणारी महिला कुप्पल यांचा रुग्णालयातच मृत्यू झाल आहे. करुप्पनकाउंडर यांची प्रकृती सध्या गंभीर आहे. रविवारी आरोपी कल्याणसुंदरम व साबरी यांना अटक करण्यात आल आहे. दोघांनाही आता १५ दिवसांची न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी, सर्व खबरदारीचे उपाय केले जात आहे. यातच असा हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. Covid 19 cure pills given family erod three dead

जगभरातील अनेक रुग्णालयात कोरोनारुग्णांना उपचार सुरू आहेत. या दरम्यान रुग्णालया Hospital मधील कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष काळजी घेणे, गरजेचे आहे. मात्र, कधी- कधी रुग्णालयाचा निष्काळजीपणा समोर दिसून येत आहे. कोरोना हा महाभयंकर संकटाचा सामना करत असताना, काही रुग्णालये ही कोरोना रुग्णांकडून जास्त पैसे उकळत आहे. रुग्णांना उपचार नंतर भले मोठे बिल देण्यात येत आहे. खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांची लूट सुरू असल्याचे घटना समोर येत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com