Corona Wave Alert: WHO चा नवा अॅलर्ट; युरोपात आणखी एका कोरोना लाटेची शक्यता

कोरोनाची आणखी एक लाट येण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे.
Corona Wave News Update
Corona Wave News UpdateSAAM TV

नवी दिल्ली: कोरोना संसर्गाने अवघं जग संकटात सापडलं. या मोठ्या महामारीच्या संकटातून जग सावरत असताना, जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि युरोपियन सेंटर फॉर डिसीस प्रिव्हेंशन अँड कंट्रोल (ECDC) ने बुधवारी नवा अॅलर्ट दिला आहे.

कोरोनाची (Covid 19) आणखी एक लाट संपूर्ण युरोपात पुन्हा येण्याची शक्यता आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. युरोपमधील अनेक भागांत कोरोनाचे रुग्ण पुन्हा झपाट्याने वाढू लागले आहेत. (Latest Marathi News)

Corona Wave News Update
कोरोना काळात कर्तव्य बजावणाऱ्या 'या' कर्मचाऱ्यांनाही सानुग्रह सहाय्य मिळणार; सरकारची मान्यता

जागतिक आरोग्य संघटनेचे युरोपातील संचालक हॅन्स क्लूज आणि ईसीडीसीचे संचालक अँड्रिया अम्मोन यांनी संयुक्तपणे निवेदन प्रसिद्ध केले आहे. कोविड महामारी अद्याप संपूर्णपणे संपुष्टात आलेली नाही. सुदैवानं वर्षभरापूर्वी जी परिस्थिती होती, ती आताच्या घडीला नाही, असं त्यांनी निवेदनात म्हटलं आहे.

Corona Wave News Update
Corona Update: जगातून कोरोना संपणार का? WHOचे प्रमुख, म्हणाले...

दुर्दैवाने युरोपात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे कोरोनाची आणखी एक लाट येण्याची दाट शक्यता आहे, असा सावधानतेचा इशारा आम्ही देत आहोत, असं या संयुक्त निवेदनात नमूद केलं आहे.

युरोपात २ ऑक्टोबरपर्यंतच्या आठवड्यात कोविडच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या विभागवार आकडेवारीवरून दिसून आले आहे. त्याच्या मागच्या आठवड्याच्या तुलनेत आठ टक्के वाढ झाली आहे.

दुसरीकडे युरोपात उपलब्ध असलेल्या लशींच्या आकडेवारीवरून संभ्रमावस्था निर्माण झाली आहे, असे सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील विशेषज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. डब्ल्यूएचओ आणि ईसीडीसीच्या म्हणण्यानुसार, युरोपात लाखो लोकांनी अद्याप कोविड प्रतिबंधक लसीकरण करून घेतलेले नाही.

लसीकरण करून घ्या!

युरोपीय देशांमध्ये साथीच्या आजारांचे रुग्ण वाढले आहेत. त्यापूर्वीच फ्लू आणि कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण करून घेण्याची विनंती डब्ल्यूएचओ आणि ईसीडीसीने केले आहे. ६० वर्षांहून अधिक वयाचे नागरिक, गरोदर महिलांनी इन्फ्लूएंझा आणि कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण करून घ्यायला हवे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com