कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींचे वाढले दर; जाणून घ्या नवी किंमत!

कोरोना संकटामुळे बेरोजगारी वाढलेली आहे. इंधनदरवाढ, महागाई यांमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. यातच भर म्हणून आता कोरोना लसींच्या दरात वाढ झाल्याचे सांगितले जात आहे.
कोव्हिशिल्डआणि कोव्हॅक्सिन लसींचे वाढले दर; जाणून घ्या नवी किंमत!
कोव्हिशिल्डआणि कोव्हॅक्सिन लसींचे वाढले दर; जाणून घ्या नवी किंमत! Saam Tv
Published On

पुणे : कोरोना Corona संकटामुळे बेरोजगारी वाढलेली आहे. इंधनदरवाढ, महागाई यांमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. यातच भर म्हणून आता कोरोना लसींच्या Vaccines दरात वाढ झाल्याचे सांगितले जात आहे.

देशभरात कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत असली, तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे. देशाचा तिसऱ्या लाटेपासून बचावासाठी केंद्र Central Government आणि राज्य सरकार State Government तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अनेक उपाययोजना करत आहे.

हे देखील पहा-

लसीकरण Vaccination हाच उत्तम उपाय कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी असल्याचे म्हटले जात. त्यामुळे भारता आणि जागतिक स्तरावरील सर्वच देश लसीकरणावर सर्वाधिक भर देत आहेत. भारत मध्ये सध्या तीन लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली.

कोरोना लसीकरण मोहिमेला देशात सहा महिने उलटून गेले आहेत. आता लस उत्पादक कंपन्यांकडून सांगण्यात येत आहे की, लसींच्या दरात वाढ करण्यात येणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लसींचे उत्पादन सुरु आहे त्यामुळे लसींच्या किमतीत येत्या काळात घट होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, आता याउलट होत आहे.

लसींचे दर जानेवारी ते जुलै या कालावधीसाठी निश्चित करण्यात आले होते. आता त्यात वाढ झालेली दिसत आहे. कोव्हिशिल्ड Covishield लसीसाठी 200 रुपये आणि कोव्हॅक्सिन Covaxin लसीच्या एका डोससाठी 206 रुपयांचा दर निश्चित करण्यात आला होता.

आता या सरकारसाठी असलेल्या दरात वाढ करण्यात आली आहे. कोव्हिशिल्ड लसीसाठी 205 रुपये आणि कोव्हॅक्सिन लसीसाठी 215 रुपये सरकारला मोजावे लागणार आहेत. याचाच अर्थ कोव्हिशिल्ड लसीच्या 10 डोस असलेल्या एक शीशी मागे सरकारला 50 रुपये अधिक द्यावे लागणार आहेत.

कोव्हिशिल्डआणि कोव्हॅक्सिन लसींचे वाढले दर; जाणून घ्या नवी किंमत!
घाबरण्याचे कारण नाही; जयंत पाटीलांचे सांगलीकरांना आवाहन

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली, तर कोव्हॅक्सिन लसीच्या 20 डोस असलेल्या एका शीशी मागे सरकारला 180 रुपये जास्त मोजावे लागतील असे सांगितले जात आहे. त्यामुळे सरकारला आता आता नवीन किमतीनुसारच लसींसाठी ऑर्डर द्यावी लागेल.

तसेच कोव्हॅक्सिनचे उत्पादनही भारत बायोटेक संथगतीने करत असल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारसह खासगी लसीकरण केंद्रांनाही कोव्हॅक्सिनची लस महाग दरात मिळणार असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे.

भारत बायोटेकची कोव्हॅक्सिनची लस आयसीएमआरच्या मदतीने तयार करण्यात आली. लसींच्या एकूण नफ्याच्या पाच टक्के रक्कम ICMR ला दिली जाणार आहे. नफ्याची ही रक्कम भारत बायोटेककडून वर्षातून दोनवेळी दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

देशव्यापी मोहिमेत आतापर्यंत 44.19 कोटी लोकांना कोरोना विषाणूला प्रतिबंधक लस दिली गेली आहे. मुलांसाठी कोरोना लस येत्या ऑगस्ट महिन्यात उपलब्ध होऊ शकते असे सांगितले जात आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com