घाबरण्याचे कारण नाही; जयंत पाटीलांचे सांगलीकरांना आवाहन

त्यांनी ट्विट करून या संदर्भात माहिती दिली आहे. ते म्हणले की, सांगली येथे कृष्णा नदीचा पूर ओसरून पाणी पातळी ४० फुट इतकी सुरक्षित झाली आहे. ती आणखी कमी होत आहे.
घाबरण्याचे कारण नाही; जयंत पाटीलांचे सांगलीकरांना आवाहन
घाबरण्याचे कारण नाही; जयंत पाटीलांचे सांगलीकरांना आवाहनSaam Tv
Published On

वैदेही काणेकर

सांगली : महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री जयंत पाटील Jayant Patil यांनी सांगलीकरांना आवाहन केले आहे. त्यांनी ट्विट करून यानासंदभातव माहिती दिली आहे. ते म्हणले की, सांगली येथे कृष्णा नदीचा पूर Flood ओसरून पाणी पातळी ४० फुट इतकी सुरक्षित झाली आहे. ती आणखी कमी होत आहे. सध्या कोयना धरणात पाणी साठा ९० टीएमसी असून (८७%) धरणातून ३०००० क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे.

पुढे ते म्हणाले की, पुढील आठवड्यात मोठ्या पावसाचा अंदाज असून धरणातून पाणी विसर्ग थोडासा वाढवून पाणी साठा कमी केल्यास मोठ्या पावसाच्या कालावधीत विसर्ग नियंत्रित ठेवतां येईल. त्यामुळे कोयना धरणातून सद्याचा ३०००० विसर्ग थोडासा वाढवून ५०००० क्यूसेक्स करण्याचे नियोजन आहे. असे त्यांनी ट्विट च्या माध्यमातून माहिती दिली आहे.

तसेच सांगली येथे कृष्णाची पातळी काही परमाणात वाढेल परंतु घाबरणयाचे कारण नाही, मोठा पाऊस जर आला तर तो धरणांतच अडवण आवश्यक आहे. नागरीकांनी काळजी करू नये. अस आवाहन त्यांनी केलं आहे.

दरम्यान, कोयना धरणात 24 तासात 12 टीएमसी पाणी पातळीचा उचांक आहे. मात्र गेल्या 24 तासात 18 टीएमसी उचांकाची पातळी पाण्याने गाठली आहे. त्यामुळे काल रात्री पासून कोल्हापूर, सांगली भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे. असे जयंत पाटील यांनी सांगितले होते.

घाबरण्याचे कारण नाही; जयंत पाटीलांचे सांगलीकरांना आवाहन
HSC Result: प्रतिक्षा संपली या आठवड्यात निकाल लागण्याची शक्यता

ते म्हणाले होते की, कोयना धरणातून सध्या 10 हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. तो आता 50 हजार क्युसेक्स पर्यंत वाढवण्यात येणार आहे. कोयना धरणातून विसर्ग होणारे पाणी सध्या महाराष्ट्र बॉडरवरील राजापूर धरणापर्यंत पोहचले आहे. अद्यापही पाणी कर्नाटक मधील अल्मट्टी धरणापर्यंत पोहचले नसल्याची माहिती देखील त्यांनी दिली होती.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com