नवी दिल्ली : देशात कोरोना (Corona) व्हायरसचा प्रादुर्भाव काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. दिवसागणिक मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे कोरोनाची चौथी लाट येते की काय? अशी भीती व्यक्त केली जात आहे. आता गेल्या 24 तासांची आकडेवारी केंद्र सरकारने जाहीर केली असून, त्यातही हेच चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे (corona new patients) तब्बल 12 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहे. मागील चार महिन्यातली ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. (Corona Virus Latest News in India)
आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे तब्बल 12 हजार 213 नवे रुग्ण आढळून आले आहेत. नव्याने आढळून आलेली रुग्णसंख्या ही गेल्या चार महिन्यातील सर्वाधिक रुग्णसंख्या ठरली आहे. गेल्या तीन दिवसांपासून देशात सलग 8 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत होते. आज ही रुग्णसंख्या 12 हजारांवर गेल्याने आरोग्य प्रशासनाचं टेन्शन वाढलं आहे.
दरम्यान, नव्याने आढळून आलेल्या कोरोना रुग्णांमुळे देशातील कोरोनाबाधित रुग्णांची सक्रिय रुग्णसंख्या 58 हजार 215 वर पोहचली आहे. देशात सध्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा दर 2.35 टक्के इतका आहे. दुसरीकडे गेल्या 24 तासांत 11 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची एकूण संख्या 5,24,803 वर पोहचली आहे.
दरम्यान, देशात गेल्या 24 तासांत 7,624 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 4,26,74,712 झाली आहे. देशात आतापर्यंत एकूण 1,95,67,37,014 लसीकरण करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील स्थिती चिंताजनक
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. गेल्या 24 तासांतील आकडेवारीने महाराष्ट्राचे पुन्हा टेन्शन वाढवले आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत तब्बल हजार 024 नवे रुग्ण सापडले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे या कालावधीत 3 हजार 028 रुग्णांनी कोरोनावर मातही केली आहे. महाराष्ट्रात सध्या कोरोनाचे 19,261 रुग्ण उपचार घेत आहेत.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.