Himachal Pradesh Election 2022: हिमाचल प्रदेशात यावेळी कॉंग्रेसनं करिश्मा केला आहे. विधानसभा निवडणुकीचे आले असून हिमाचलमध्ये आता कॉंग्रेसचं सरकार स्थापन होणार हे जवळपास निश्चित आहे. अशात हिमाचल प्रदेशातल्या अनेक कॉंग्रेस दिग्गजांनी मुख्यमंत्री पदासाठी दावा ठोकला आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार आणि कॉंग्रेस हायकामांडच्या मनात कोण आहे याबाबत उत्सुकता लागली आहे. (Who Will Be CM Of Himachal Pradesh)
हिमाचल प्रदेश राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी बहुमचाता आकडा हा 35 आहे. काँग्रेसने जादूई आकडा पार केला आहे. अशा परिस्थितीत हिमाचलमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन होणार आहे. हिमाचलमध्ये काँग्रेस सरकार स्थापन करेल पण त्यांचा मुख्यमंत्री कोण होणार यावर सस्पेंस कायम आहे.
निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी दावा केला होता. मात्र मुख्यमंत्रीपदाचा दावा मांडणारे अनेक उमेदवार निवडणुकीत (Election 2022) पराभूत झाले आहेत. त्यामुळे पक्षातील मुख्यमंत्रिपदाचे दावेदार आता कमी झाले आहेत. पण काँग्रेसचा मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न अजूनही कायम आहे.
कॉंग्रेस हायकमांड हिमाचल प्रदेशमधील नेते विक्रमादित्य सिंग, प्रतिभा सिंग, सुखविंदर सिंग सुखू आणि मुकेश अग्निहोत्री यांच्यापैकी पक्ष कोणाला मुख्यमंत्री बनवणार? याबाबत अजूनही भूमिका स्पष्ट झालेली नाही. (Latest Marathi News)
हिमाचलचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचा मुलगा विक्रमादित्य सिंग यांचेही नाव मुख्यमंत्रिपदाच्या यादीत आघाडीवर आहे. त्यांची आई प्रतिभा सिंह या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा आहेत. त्यामुळे त्याचा दावा नाकारता येत नाही. विक्रमादित्य यांनी आधीच सांगितले आहे की, आमच्या कुटुंबाने नेहमीच जनतेला दिले आहे. कधी कोणाकडून काही मागितले नाही. मुख्यमंत्र्यांबाबत हायकमांड जो निर्णय घेईल तो सर्वांना मान्य असेल.
माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा सिंह यादेखील मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. ते राज्यात कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि निवडणुकीपूर्वी त्यांची नाराजी ज्याप्रकारे समोर आली, त्यावरून त्यांची महत्त्वाकांक्षा काही औरच असल्याचे स्पष्ट होते. त्यांनी निवडणूक प्रचारादरम्यान सांगितले होते की, मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सहभागी नाही. पण नेत्यांच्या राजकीय विधानाचा अर्थ वेगळाही असू शकतो. तसेच त्या हायकमांडसमोर आपल्या मुलाची वकिली करू शकतात.
या यादीत आणखी एक नाव समोर आले आहे, ते म्हणजे सुखविंदर सिंग सुखू याचे. सुखविंदर सिंग सुखू हे काँग्रेसच्या निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष आहेत. राज्यात वीरभद्र सिंह यांच्या विरोधाला न जुमानता राहुल गांधी यांच्या अत्यंत जवळचे असलेले सुखविंदर सिंग यांना राज्याची कमान मिळाली अशा परिस्थितीत सुखविंदर सिंग यांच्याही दावेदारीकडे हायकमांडला दुर्लक्ष करता येणार नाही.
या यादीत शेवटचं नाव म्हणजे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते मुकेश अग्निहोत्रीही या शर्यतीत सामील होऊ शकतात. अग्निहोत्री हे वीरभद्र सिंह यांच्या जवळचे मानले जात होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्षा प्रतिभा सिंह देखील मुकेश अग्निहोत्री यांच्या नावाला पाठिंबा देऊ शकतात. मात्र, निवडणुकीपूर्वी पक्षांतर्गत कलहामुळे काँग्रेस हायकमांड ज्या प्रकारे हैराण झाले होते, ते पाहता पक्ष कोणता अनपेक्षित निर्णय घेऊ शकतो. अशा परिस्थितीत सध्या एक-दोन दिवसांत काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्या दिग्गज नेत्यांच्या हृदयाचे ठोके वाढलेलेच राहणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.