Manipur Election Results 2022: मणिपूरमध्ये भाजपचा विक्रम; काँग्रेसची लाजिरवाणी कामगिरी

5 राज्यांमध्ये चालू असलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये (Manipur Election Results 2022) मतमोजणी पडली आहे.
Manipur Election Results 2022: मणिपूरमध्ये भाजपचा विक्रम; काँग्रेसची लाजिरवाणी कामगिरी
Manipur Election Results 2022: मणिपूरमध्ये भाजपचा विक्रम; काँग्रेसची लाजिरवाणी कामगिरीSaam Tv
Published On

वृत्तसंस्था: 5 राज्यांमध्ये चालू असलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये (Manipur Election Results 2022) मतमोजणी सुरू आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने ज्या पद्धतीने चमकदार कामगिरी करून विजय मिळवला आहे. तसेच मणिपूरमधील (Manipur) सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने सर्व समीकरणे चुकीची सिद्ध करत या ईशान्येकडील राज्यात (state) आपली सर्वोत्तम कामगिरी बजावली आहे. यावेळी भाजप (BJP) स्वबळावर पूर्ण बहुमत मिळवताना दिसत नाही तर गतवेळच्या तुलनेत 10 अधिक जागा आपल्या खात्यात टाकण्यातही ते यशस्वी झाले आहेत. तर काँग्रेस (Congress) आतापर्यंतच्या सर्वात वाईट टप्प्याला तोंड देत आहे. (Congress record wipe out in manipur)

हे देखील पहा-

मणिपूरमध्ये (Manipur) भारतीय जनता पक्षाला सत्ताविरोधी लाटेचा सामना करावा लागला आहे, असे मानले जात होते. परंतु, भगवा पक्ष पूर्ण बहुमत मिळवून ऐतिहासिक कामगिरी करत पुढे गेला. 60 सदस्यीय विधानसभेतील मतमोजणीनुसार भाजप 31 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेसची कामगिरी खराब असून केवळ 6 जागांवर आघाडीवर आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला 28 जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्यांना 22 जागांवर फटका बसला आहे. नागा पीपल्स फ्रंटला 7 जागांवर आघाडी आहे.

Manipur Election Results 2022: मणिपूरमध्ये भाजपचा विक्रम; काँग्रेसची लाजिरवाणी कामगिरी
Manipur Election Results 2022: शिवसेना- राष्ट्रवादीपेक्षा आठवलेंच लयभारी; रिपाइंच्या उमेदवाराची आघाडी

5 वर्षांपूर्वी निवडणुकीत मोठा पक्ष म्हणून उदयास येऊनही राज्यात सरकार स्थापन करण्यात अपयशी ठरलेल्या काँग्रेसला यावेळी पुन्हा सत्तेत यश येईल, अशी आशा होती. मात्र गेल्या वेळेच्या तुलनेत त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे भाजपने मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्यासोबत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी पक्ष नेतृत्वाचा निर्णय योग्य ठरवला.

2017 मध्ये मणिपूरमधून सत्ता गमावलेल्या काँग्रेसने येथे 15 वर्षे राज्य केले. हे राज्य काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता, मात्र भाजपने त्यांच्या बालेकिल्ल्यात दांडी मारली. 2017 च्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसले तरी, 21 जागा असूनही भाजपने राजकीय गणित मांडून प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन केले.

Edited by- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com