Rahul Gandhi: राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचं ठिकाण बदललं; इंम्फाळाऐवजी या ठिकाणाहून सुरू होणार यात्रा

Bharat Jodo Nyay Yatra: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ४ महिन्यांआधीच ही यात्रा काढण्यात येणार आहे. ही यात्रा १४ राज्ये आणि ८५ जिल्ह्यांतून जाणार आहे. या काळात राहुल गांधी पायी आणि बसने ६ हजार २०० किलोमीटरहून अधिक अंतरात प्रवास करणार आहेत.
Rahul Gandhi
Rahul GandhiSaam TV
Published On

Congress News:

राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेबाबत एक अपडेट समोर आली आहे. न्याय यात्रेच्या सुरुवातीचं ठिकाणं बदलण्यात आलं आहे. मणिपूरची राजधानी इंम्फाळाऐवजी ही यात्रा आता थैबुल येथून सुरू होणार आहे. पोलीस प्रशासनाकडून यात्रेसाठी देण्यात आलेल्या नियम आणि अटींमुळे काँग्रेसने हा निर्णय घेतल्याचं समजलं आहे.

Rahul Gandhi
Rahul Narvekar Video: शिवसेना शिंदेंची , मग ठाकरेंचे आमदारही पात्र कसे ठरले ... विधानसभा अध्यक्षांनी कोणत्या गोष्टी नमूद केल्या?

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पोलिस प्रशासनाने यात्रेसाठी फक्त १ हजार लोकांना परवानगी दिली होती. मात्र यात्रेला जास्त लोक येणार असल्याने ठिकाण बदलण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. इंफाळ पासून ३४ किमी दूर असलेल्या थौबुल या ठिकाणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला इंम्फाळामध्ये शुक्रवारी रात्री उशिरा परवानगी मिळाली होती. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पाहता यात्रेत मोजकेच लोक दाखल व्हावेत म्हणून १ हजार व्यक्तींना परवानगी देण्यात आली.

यात्रेदरम्यान जास्त गर्दी होणार नाही याची खबरदरी घेण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या होत्या. १४ जानेवारीला इंम्फाळमधून ही यात्रा सुरू होणार होती. मात्र काँग्रेसने इंम्फाळाऐवजी थैबुल हे ठिकाण यात्रेच्या सुरुवातीसाठी निवडलं आहे.

भारत जोडो न्याय यात्रेत १४ राज्ये आणि ८५ जिल्ह्यांचा समावेश

राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा मणिपूरपासून सुरू होऊन २० मार्चला मुंबईत सांगता होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ४ महिन्यांआधीच ही यात्रा काढण्यात येणार आहे. ही यात्रा १४ राज्ये आणि ८५ जिल्ह्यांतून जाणार आहे. या काळात राहुल गांधी पायी आणि बसने ६ हजार २०० किलोमीटरहून अधिक अंतरात प्रवास करणार आहेत.

Rahul Gandhi
Rahul Dravid: भारतासह राहुल द्रविड खेळलाय या देशासाठी! ११ सामन्यांमध्ये पाडलाय धावांचा पाऊस

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com