
काँग्रेस खासदार हरीश मीणा यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला
हरीश मीणा यांच्या ४० वर्षीय मुलाचा मृत्यू झाला
हृदयविकाराच्या झटक्याने हनुमंत मीणा यांचे निधन झाले
जयपूरमधील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला
राजस्थानच्या टोंक-सवाई माधोपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि माजी पोलिस महासंचालक हरीशचंद्र मीणा यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हरीशचंद्र मीणा यांच्या ४० वर्षीय मुलाचे हार्ट अटॅकने निधन झाले. हनुमंत मीणा यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून जयपूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज त्यांचे निधन झाले.
हरीशचंद्र मीणा यांचा मुलगा हनुमंत मीणा हे व्यापारी होते. ते राजकारणात सक्रीयपणे सहभागी नव्हते. त्यांना हार्ट अटॅक आला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी जयपूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुलाच्या अकाली निधनामुळे मीणा कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. हनुमंत मीणा यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
खासदार हरीश मीणा हे १९७६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते आणि सध्या ते टोंक-सवाई माधोपूर येथून काँग्रेसचे खासदार आहेत. त्यांनी २०१४ पासून भाजपमधून राजकीय कारकिर्दला सुरूवात केली. दौसा येथून ते खासदार झाले होते. त्यानंतर २०१८ मध्ये त्यांनी भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. २०२४ ची लोकसभा निवडणूक त्यांनी लढवली. या निवडणुकीत टोंक- सवाई माधोपूर येथून ते खासदार म्हणून निवडून आले.
राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी या घटनेवर शोक व्यक्त केले. 'या दु:खद काळात मी मीणा कुटुंबीयांच्या प्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो. देव त्यांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो.', असे गहलोत यांनी सांगितले. हनुमंत मीणा यांच्या निधनाचे वृत्त कळताच सचिन पायलट यांनी सर्व कार्यक्रम रद्द केले. ते जयपूरला रवाना झाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.