अमृतसर: अमृतसरमधील शिवसेना तकसाली नेते सुधीर सुरी यांच्या हत्येचा तपास करणार्या पोलिसांना आरोपी संदीप सिंगच्या गाडीतून एक फाईल सापडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्या फाइलमध्ये कॉमेडियन भारती सिंह (Bharti Singh) आणि अँटी टेररिस्ट फ्रंटचे अध्यक्ष मनिंदर जीत सिंह बिट्टा यांचा फोटो आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोर स्विफ्ट कारमधून आला होता. हल्ल्यानंतर तो कारमधून पळू लागला तेव्हा लोकांनी त्याच्या गाडीवर दगडफेक केली.
आज तकच्या वृत्तानुसार, गाडीवर 'वारीस पंजाब दे'चे प्रमुख अमृतपाल सिंग यांचा फोटो आहे. अमृतपाल हा जनरलसिंग भिंद्रनवालेचा समर्थक आहे. त्याला खलिस्तानी समर्थक मानलं जातं. पोलिसांनी कार ताब्यात घेऊन तपास सुरू केला तेव्हा कारमधून एक फाईल सापडली, ज्यामध्ये दोन फोटो सापडले. भारती सिंगचा फोटो असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांनी त्या दिशेने देखील तपास सुरु केला आहे. (Latest Marathi News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीर सुरी गोपाल हे मंदिराबाहेरील कचऱ्यात देवांच्या मूर्ती सापडल्याच्या निषेधार्थ मंदिराबाहेर आंदोलन करत होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास संदीप सिंगने त्याच्यावर गर्दीतून गोळ्या झाडल्या. आरोपीने लायसन्स बंदूकीतून शस्त्राने सुरी यांच्यावर गोळीबार केला होता.
शिवसेना नेत्याच्या सुरक्षेत वाढ
23 ऑक्टोबर रोजी पंजाबमधील एसटीएफ आणि अमृतसर पोलिसांनी गेल्या महिन्यात 4 गुंडांना अटक केली होती. अटक करण्यात आलेले गुंड हे रिंडा आणि लिंडा यांचे गुंड होते. शिवसेना नेते सुधीर सुरी यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचत असल्याचे त्यांनी चौकशीदरम्यान सांगितले होते. त्यांनी रेकीही केली होती. दिवाळीपूर्वी सुरी यांच्यावर हल्ला करण्याची योजना आखली होती, असेही आरोपींनी सांगितले होते. यानंतर पंजाबच्या अनेक गुंडांकडून धमक्या आल्यानंतर पोलिसांनी त्यांना सुरक्षा दिली होती. हल्ल्याच्या वेळी पंजाबमधील आठ पोलीस अधिकारी तैनात होते. हल्लेखोराने पोलिसांसमोरच सुरी यांच्यावर गोळ्या झाडल्या.
हल्लेखोर अमृतसरचा रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीला अटक केल्यानंतर पंजाबचे डीजीपी गौरव यादव म्हणाले की, आम्ही कोणालाही सोडणार नाही. शिवसेना नेत्याची हत्या का केली याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.