
बोस्टनच्या जिलेट स्टेडिअमवर प्रसिद्ध बँड कोल्डप्लेचा कॉन्सर्ट झाला. या कॉन्सर्टमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या कॉन्सर्टमध्ये अमेरिकेतील एका प्रसिद्ध कंपनीचा सीईओ आणि त्याची गर्लफ्रेंड म्हणजेच या कंपनीची एचआर हे देखील सहभागी झाले होते. त्यांचाच लाइव्ह कॉन्सर्टमध्ये रोमान्स करतानाचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कंपनीकडून या दोघांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
अमेरिकेतील टेक कंपनी एस्ट्रोनॉमरने कोल्डप्ले कॉन्सर्टमध्ये आपल्या कंपनीतील दोन कर्मचाऱ्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना सुट्टीवर पाठवले आहे. या कंपनीचा सीईओ आणि एचआर या दोघांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कंपनीने तपास करण्याचे आदेश दिले होते. शुक्रवार रात्री उशिरा कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर सांगितले की, सीईओ अँडी बायर्न यांना सुट्टीवर पाठवले. कंपनीने केलेल्या पोस्टमध्ये व्हायरल व्हिडीओची माहिती नमूद करण्यात आली नाही. कंपनीने या दोघांविरोधात कारवाई केल्यानंतर को-फाऊंडर आणि चीफ प्रोडक्ट ऑफिसर पीट डेजॉय यांची अंतरिम सीईओ म्हणून नियुक्ती केली.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये कोल्डप्ले कॉन्सर्टमध्ये सीईओ आणि एचआर मोठ्या स्क्रीनवर दिसले. त्यानंतर त्यांनी तोंड लपवून तिथून पळ काढला. कोल्डप्लेचे मुख्य गायक क्रिस मार्टिनने या दोघांना लपताना पाहून उपस्थितांना म्हणाला की,'एक तर त्यांचे अफेअर सुरू आहे, किंवा ते लाजत आहेत.' त्यांचा हा व्हिडीओ टिकटॉकवर तुफान व्हायरल होत आहे. सध्या या व्हिडीओची जोरदार चर्चा होत आहे.
दरम्यान, कोल्डप्लेच्या कॉन्सर्टमध्ये किस कॅम गेममध्ये दिसलेले हे कपल डेटा-सॉफ्टवेअर कंपनी एस्ट्रोनॉमरचे सीईओ अँडी बायर्न आणि त्याच कंपनीचे चीफ पीपल ऑफिसर क्रिस्टिन कॅबोट होते. आणि दोघांचेही अफेअर होते. म्हणूनच जेव्हा कोल्डप्ले कॉन्सर्टमध्ये कॅमेरामनने त्यांच्याकडे कॅमेरा दाखवला तेव्हा क्रिस्टिन कॅबोटने दोन्ही हाताने चेहरा झाकला आणि अँडी बायरन खाली बसून स्वत:ला लपवून लागला. कोल्डप्ले कॉन्सर्ट दरम्यानच्या या व्हायरल व्हिडिओमुळे त्यांचे अफेअर सार्वजनिक झाले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.