Ladki bahin yojana : लाडकी बहीण योजना बंद नाही; CM एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं? पाहा VIDEO

Cm eknath shinde on Ladki bahin yojana : लाडकी बहीण योजनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही ब्रेक लावला नसल्याचं CM शिंदेंनी म्हटलं.
लाडकी बहीण योजनेला ब्रेक नाही; CM एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, VIDEO
CM Eknath ShindeYandex
Published On

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातील राजकारण तापलं आहे. या विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तू-तू-मै-मै सुरु आहे. लाडकी बहीण योजनेवर सरकारने ब्रेक लावल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही ब्रेक लावला नसून आगाऊ पैसे दिल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कालपासून दिल्ली दौऱ्यावर आहेत. महायुतीच्या जागावाटपासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक होत आहे. याचदरम्यान, लाडकी बहीण योजनेवरील विरोधकांच्या आरोपांवर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.

लाडकी बहीण योजनेला ब्रेक नाही; CM एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, VIDEO
Who Is Vijaya Rahatkar : पहिल्यांदाच मराठी महिलेची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती, जाणून घ्या कोण आहेत 'विजया रहाटकर'?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'लाडकी बहीण योजनेला ब्रेक लावण्याचा प्रश्न आलाच नाही. आम्ही आगाऊ पैसे दिले आहेत. आमची नियत साफ आहे. आमची देण्याची वृत्ती आहे. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून निर्णय घेतला नाही. आम्ही ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पैसे दिले आहेत. आम्ही आगाऊ पैसे घेणारे नाही. तर पैसे देणारे आहोत'.

लाडकी बहीण योजनेला ब्रेक नाही; CM एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, VIDEO
Viral Video: रीलचे वेड तरुणाच्या अंगलट...! धबधब्यावर असताना पाय घसरला अन्; पुढे जे घडलं ते भयंकरच; पाहा VIDEO

अमित शहा यांच्या बैठकीबाबत बोलताना शिंदे म्हणाले, 'महायुतीची चर्चा सकारात्मक झाली. ही चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. सर्व जागांबाबत १-२ दिवसांत निर्णय होईल. तुम्हाला सांगू, खरंतर आता तिढा राहिलेला नाही. राज्यातील 25-30 जागांवर निर्णय बाकी आहे, तोही लगेच होईल'.

महायुतीच्या जागावाटपावर फडणवीस काय म्हणाले?

महायुतीच्या जागावाटपावर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. काही अडचणीच्या जाग्या होत्या, त्या बऱ्यापैकी क्लिअर झालेले आहेत. काही जागा बाकी आहे, त्याचबरोबर ही लवकर चर्चा करू. ज्या जागा क्लिअर झालेल्या आहेत. त्या आपापल्या पक्षाने आपापल्या पद्धतीने घोषित घोषित कराव्या असं ठरलं आहे. ब्रेक इव्हन पॉईंट लवकर सांगू'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com