Eknath Shinde Announcement : अयोध्येत भव्य महाराष्ट्र भवन उभारणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

Eknath Shinde News : अयोध्येत भव्य दिव्य महाराष्ट्र भवन उभारणार, अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदेंनी केली.
CM Eknath Shinde Big Announcement
CM Eknath Shinde Big Announcement Saam TV
Published On

CM Eknath Shinde Big Announcement : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदेंचा हा पहिलाच अयोध्या दौरा आहे. त्यामुळे या दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचं लश्र लागून आहे. दरम्यान, अयोध्येत दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी पत्रकारपरिषद घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडलं. त्याचबरोबर एक मोठी घोषणा देखील केली.  (Latest Marathi News)

CM Eknath Shinde Big Announcement
Ravikant Tupkar on CM Ayodhya visit : रोम जळत असताना राजा बिगुल वाजवत बसला होता, तशी राज्याची अवस्था; रविकांत तुपकर यांची टीका

अयोध्येत भव्य दिव्य महाराष्ट्र भवन उभारणार, अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदेंनी (Eknath Shinde) केली. उत्तर भारतीय आणि महाराष्ट्र काही वेगळा नाही, असं विधानही त्यांनी केलं. याआधी देखील एका कार्यक्रमात बोलताना उत्तर प्रदेशातील अयोध्येत लवकरच महाराष्ट्र भवन बांधले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती.

काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?

एकनाथ शिंदे म्हणाले की, "शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे अयोध्येत भव्य दिव्य राम मंदिर उभारण्याचे स्वप्न होते, जे पंतप्रधान मोदींनी पवित्र भूमीवर मंदिराचे बांधकाम सुरू करून पूर्ण केले. संपूर्ण वातावरण भगवेमय झालं आहे. राममय झाले आहे", असं एकनाथ शिंदे म्हणाले.

"आज राममंदिराच्या उभारणीचे कामही पाहिले. सगळ्यांना वाटायचं की राम मंदिर कसं बांधणार? लोक म्हणायचे 'मंदिर वहीं बनाएंगे, लेकिन तारीख नहीं बताएंगे? पण पीएम मोदींनी ते करून दाखवलं आणि तारीखही सांगितली. जे शंका उपस्थित करत होते, त्यांना घरी बसवलं आहे", अशी टीका देखील मुख्यमंत्री शिंदेंनी केली.

"काही लोकांना हिंदूत्वाची अॅलर्जी"

"राममंदिर राजकारणाचा विषय अजिबात नाही. माझ्या दौऱ्याचा काही लोकांना  (Maharashtra Politics) त्रास होत आहे. ते जाणून बुजून टीका करतायत. काही लोकांना हिंदूत्वाची अॅलर्जी आहे. सर्वांना सोबत घेऊन जाणारा हिंदूत्व आहे. हिंदू धर्म सर्व धर्माचा आदर शिकवतो. मोदींमुळे देशात हिंदुत्वाचा जागर मांडला गेला. काही अल्पसंतुष्ट लोक गैरसमज पसरवत आहेत. काही लोकांना हिंदुत्वाची अॅलर्जी आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

"अयोध्येत भव्य महाराष्ट्र भवन उभारणार"

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी यावेळी एक मोठी घोषणा देखील केली. अयोध्येत भव्य महाराष्ट्र भवन उभारणार, असं ते म्हणाले. त्याचबरोबर उत्तर भारतीय आणि महाराष्ट्र वेगळं नाही. असंही शिंदे यावेळी म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तर प्रदेशचे मंत्री स्वतंत्र देव सिंह हेही अयोध्येत पोहोचले. देवेंद्र फडणवीस प्रार्थना करून लखनौला रवाना झाले आहे. तर मुख्यमंत्री शिंदे मुक्काम करून शरयू नदीच्या काठावर सायंकाळच्या महाआरतीत सहभागी होणार आहेत.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com