CM Kejriwal Letter to Amit Shah : दिल्लीतील पूरस्थिती गंभीर, CM केजरीवाल यांचं मदतीसाठी अमित शाहांना पत्र

Delhi News : दिल्लीतील पूरस्थितीबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सचिवालयात तातडीची बैठक घेतली.
Delhi Flood
Delhi FloodSaam TV
Published On

Delhi Flood : देशाची राजधानी  दिल्लीत पूरपरिस्थिती आहे. 1978 नंतर 45 वर्षात पहिल्यांदाच यमुना नदी विक्रमी पातळीवर वाहत आहे. दिल्लीतील सखल भाग जनजीवन विस्कळीत झालं आहे. रहिवासी भागात पाणी शिरलं आहे. रस्ते, बाजारपेठा सगळीकडे पाणी साचलं आहे. दिल्लीतील पूर परिस्थिती चिंताजनक आहे.

दिल्लीतील पूरस्थितीबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सचिवालयात तातडीची बैठक घेतली. या बैठकीला मंत्री, महापौर आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यमुनेच्या वाढत्या पाणी पातळीबद्दल चिंता व्यक्त करत याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या पत्रात लिहिले की, बुधवारी दुपारी 1 वाजता दिल्लीतील यमुनेची पातळी 207.55 मीटरवर पोहोचली आहे. ते धोक्याच्या चिन्हाच्या (205.33 मीटर) वर आहे. (Heavy Rain)

Delhi Flood
Washim Heavy Rain : कोयाळी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस; शेतात पाणी साचल्‍याने नुकसान

याआधी 1978 मध्ये यमुनेची कमाल पातळी 207.49 मीटर होती. त्यावेळी दिल्लीत पूर आला होता आणि परिस्थिती अत्यंत गंभीर बनली होती. आता 207.55 मीटरच्या पातळीवर यमुना नदी पोहोचली आहे.

केंद्रीय जल आयोगाच्या नुकत्याच आलेल्या अंदाजानुसार यमुनेची पातळी आज रात्री 207.72 मीटरपर्यंत पोहोचेल. ही अत्यंत चिंतेची बाब आहे. दिल्लीत गेल्या तीन दिवसांपासून पाऊस पडलेला नाही. यमुना नदीची पाणी पातळी पावसामुळे नाही तर हरियाणातील हथिनीकुंड धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे वाढत आहे. माझीर विनंती आहे की शक्य असल्यास हथिनीकुंडचे पाणी मर्यादित वेगाने सोडावे. जेणेकरून दिल्लीतील यमुनेची पातळी आणखी वाढू नये, असं केजरीवाल यांनी पत्रात लिहिलं आहे. (Breaking Marathi News)

Delhi Flood
Job Offer : ना IIT... ना IIM... पहिलीच नोकरी ८५ लाख रुपयांच्या पॅकेजची; कोण आहे राशी बग्गा?

जी-20 शिखर परिषदेचा दाखला

जी-20 शिखर परिषदेचा दाखला देत दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे की, दिल्ली ही देशाची राजधानी आहे. काही आठवड्यात येथे G20 शिखर परिषद होणार आहे. देशाच्या राजधानीत आलेल्या पुराच्या बातम्यांनी जगाला चांगला संदेश जाणार नाही. आपण सर्वांनी मिळून दिल्लीच्या जनतेला या परिस्थितीतून वाचवायले पाहिजे.

कुठे पाणी साचलं?

काश्मिर गेटच्या मोनस्ती मार्केट, रिंगरोड, यमुना घाट, यमुना बाजार परिसरात पुराचे पाणी पोहोचले आहे. येथील रस्त्यावर पाणी वाहत असल्याचे दिसत आहे. यमुना नदीलगतचा परिसर अतिशय संवेदनशील आहे. या भागात सुमारे 41 हजार लोक राहतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com