CJI :सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी कृत्रिम बुद्धिमतेवर केलं मोठं विधान; म्हणाले...

भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी कृत्रिम बुद्धिमतेवर मोठं भाष्य केलं आहे.
CJI Dhananjaya y. chandrachud
CJI Dhananjaya y. chandrachud Saam Tv
Published On

CJI Dhananjaya y. chandrachud : भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी कृत्रिम बुद्धिमतेवर मोठं भाष्य केलं आहे. सुप्रिम कोर्ट कृत्रिम बुद्धिमतेचा वापर करून त्यांचे निर्णय भारतातील सर्व भाषेत अनुवादीत करण्याकडे पाऊल टाकणार असल्याचे संकेत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी दिले आहे. (Latest Marathi News)

CJI Dhananjaya y. chandrachud
China Corona Update : चीनमध्ये कोरोना साथीचा हाहाकार; देशातील ८० टक्के जनतेत कोव्हिडचा संसर्ग

सरन्यायाधीश चंद्रचूड (Dhananjaya y. chandrachud) यांनी महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमात सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी कृत्रिम बुद्धिमतेवर मोठं विधान केलं.

सरन्यायाधीश चंद्रचूड उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाले, 'ज्या लोकांकडे संसाधनाचा अभाव आहे, त्यांच्याकडे तंत्रज्ञान पोहोचले पाहिजे. त्यांच्यात अंतर वाढलं नाही पाहिजे. इंग्रजी भाषेमुळे ग्रामीण भागातील वकिलांना निर्णयातील बारकावे समजण्यात अवघड जातं. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमतेचा उपयोग करून कोर्टाचे (Court) निर्णय सर्व भारतीय भाषेत अनुवादीत करता येऊ शकतात'.

उच्च न्यायालयात सप्टेंबर २०२२ पासून घटनापीठाच्या सुनावणी थेट प्रक्षेपण करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. थेट प्रक्षेपणाचं महत्व अधोरेखित करताना सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले,'कायद्याचे शिक्षक आणि विद्यार्थी हे काही प्रकरणे थेट प्रक्षेपणामुळे लाईव्ह पाहू शकतात. त्याचबरोबर लोकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर थेट चर्चेत भाग घेतल्यास आपल्या समाजात किती अन्याय होत आहे हे समजू शकते'.

CJI Dhananjaya y. chandrachud
Shraddha Walkar Case : श्रद्धा वालकर प्रकरणात मोठी अपडेट; आरोपी आफताबच्या अडचणीत वाढ

यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी युवा वकिलांना देखील संबोधित केले. यावेळी नवीन वकिलांसाठी संधी निर्माण करण्यावर आणि वंचित समुदायातील लोकांसाठी पुरेशा संधींची निर्मिती करण्यावर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी भाष्य केलं. तसेच त्यांनी युवा वकिलांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. आपल्या व्यवस्थेतील त्रुटी लपवण्याऐवजी त्या दूर करण्याचा प्रयत्न करायला हवा, असेही सरन्यायाधीश यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com