CM Shinde: मुख्यमंत्र्यांनी साधली संधी; NDAच्या बैठकीत एकनाथ शिंदेंनी केल्या दोन मागण्या

Cm Shinde In NDA Meeting: दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी एनडीएची बैठक पार पडली. या बैठकीत २१ पक्षांनी मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी समर्थन दिलंय. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दोन मागण्या केल्या आहेत.
CM Shinde: मुख्यमंत्र्यांनी साधली संधी; NDAच्या बैठकीत एकनाथ शिंदेंनी केल्या दोन मागण्या
Cm Shinde In NDA Meeting

नवी दिल्ली: एनडीएकडून आज सत्ता स्थापनेच्या दावा केला जाणार असून त्यापार्श्वभूमीवर दिल्लीतील पीएम निवासस्थानी एनडीएची बैठक पार पडली. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अखेरची केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेतली. त्यानंतर राष्ट्रपतींची भेट घेत आपल्या पदाचा राजीनामा दिला. मोदी सरकारमधील मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर एनडीएची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दोन मोठ्या मागण्या केल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदेंनी एनडीएच्या बैठकीत दोन मंत्री पदाची मागणी केल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.

देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला लोकसभेच्या निकालात मोठं यश मिळालं नाहीये. एकहाती बहुमत मिळेल, असा दावा करणाऱ्या भाजपला लोकसभा निवडणुकीत फक्त २४० जागा मिळाल्यात. त्यामुळे बहुमतापासून दूर असलेल्या भाजपला सत्ता स्थापनेसाठी मित्रपक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. याचपार्श्वभूमीवर आज एनडीएची बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर भाजप आणि एनडीएमधील घटक पक्ष सत्ता स्थापनेच्या दावा करणार आहेत.

या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी केलेल्या मागणीची चर्चा सर्वत्र सुरू झालीय. सत्ता स्थापनेसाठी देव पाण्यात ठेवून बसलेल्या भाजपसमोर मुख्यमंत्री शिंदेंनी एक कॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्रिपदाची मागणी केलीय. दिल्लीत काळजीवाहू पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी एनडीएची बैठक पार पडली. या बैठकीत नरेंद्र मोदींची एनडीएचे प्रमुख नेते म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर २१ पक्षांनी मोदीच पंतप्रधान व्हावे, यासाठी समर्थन दिलं.

या बैठकीत नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू आजूबाजुला बसलेले दिसले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नितीश कुमार,चंद्राबाबू नायडू यांच्यासह सर्व घटक पक्षांनी बैठकीत समर्थनाची पत्रे दिली.भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या नावाने ही पत्रे लिहिली आहेत. एनडीएच्या संसदीय पक्षाच्या नेतेपदाची निवड झाली असून वरिष्ठ नेते मोदींसोबत जाऊन सरकार स्थापनेचा दावा केला जाणार आहे.

त्यापूर्वी एनडीएच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी दिल्लीत आलेल्या मुख्यमंत्री शिंदेंना त्यांनी केलेल्या मागणी प्रकरणी प्रश्न करण्यात आला. त्यावर मुख्यमंत्री शिंदेंनी प्रतिक्रिया दिलीय. आपण कोणतीच मागणी केली नाहीये. सध्या मी मोदींना पाठिंबा देण्यासाठी आलोय. पण बाकी विषय जे आहेत,ते नंतर होतीलच, असं त्यांनी म्हटलंय.

CM Shinde: मुख्यमंत्र्यांनी साधली संधी; NDAच्या बैठकीत एकनाथ शिंदेंनी केल्या दोन मागण्या
Loksabha Election: नरेंद्र मोदीच होणार पंतप्रधान; मोदींना २१ पक्षांचे समर्थन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com