Chhattisgarh Factory Blast: कामगारांच्या किंचाळ्या, दूरवर आवाज; गनपावडर कारखान्यात भीषण स्फोट, १० ते १२ जण दगावल्याची भीती

Chhattisgarh Bemetara Factory Blast: छत्तीसगडमधील एका गनपावडर कारखान्यात आज सकाळी भीषण स्फोट झालाय. यात १० ते १२ जण दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गनपावडर कारखान्यात भीषण स्फोट
Gunpowder Factory BlastSaam Tv
Published On

डोंबिवली एमआयडीसी स्फोट प्रकरण ताजं असतानाच छत्तीसगडमध्ये आज सकाळी एका गनपावडर कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. त्यामुळे संपूर्ण इमारत कोसळली आहे. कारखान्यात काम करणारे अनेक लोकं ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याचं सांगितलं जात आहे. या दुर्घटनेत दहा ते बाराजणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. या स्फोटाचा आवाज खूप दूरवर ऐकू गेला होता.

घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. वाऱ्याच्या वेगाने या कारखान्यात बचावकार्य सुरू आहे. बेरलामधील बोरसी गावातील एका कारखान्यात (Gunpowder Factory Blast) हा स्फोट झाल्याची माहिती लाईव्ह हिंदुस्थानच्या हवाल्यानुसार मिळत आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, स्फोटाचा आवाज दूरवर ऐकू गेला होता. त्यानंतर आजुबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं (Blast News) आहे.

अनेक जखमींना रायपूर येथील मेहकरा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. बेमेतरा जिल्हाधिकारी आणि एसडीएमसह प्रशासनाचे पथक देखील घटनास्थळी पोहोचले आहे. ते घटनास्थळाची पाहणी करत ( Chhattisgarh Bemetara Factory Blast) आहेत. मृतांच्या आकड्याबाबत अजून कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. मृतांची संख्या वाढू शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे. स्फोट झाला त्यावेळी मोठ्या प्रमाणात कामगार कारखान्यात उपस्थित होते, असं सांगितलं जात आहे.

गनपावडर कारखान्यात भीषण स्फोट
Dombivli MIDC Blast: डोंबिवली एमआयडीसी दुर्घटनेत आणखी ३ मृतदेह सापडले; स्फोटातील मृतांचा आकडा वाढला; बचावकार्य सुरू

छत्तीसगडमध्ये आज सकाळी (२५ मे) ही दुर्घटना घडली आहे. भीषण स्फोट झाल्यामुळे कारखान्यात मोठी खळबळ उडाली आहे. स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकू गेला होता. अपघातस्थळी सध्या गोंधळाचं वातावरण ( Chhattisgarh News) आहे. कारखान्यातील कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणात भितीचं वातावरण आहे. अजून तरी स्फोटाचे नेमकं कारण समजू शकलेलं नाही. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.

गनपावडर कारखान्यात भीषण स्फोट
Dombivli Blast Update: डोंबिवलीतील अमुदान कंपनीच्या फरार मालकाला अटक; नाशिक पोलिसांची मोठी कारवाई

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com