सोमवार, मंगळवार शाळा, महाविद्यालयास सुटी; मुख्यमंत्र्यांची घाेषणा

School
School
Published On

चेन्नई: मुसळधार पावसामुळे चेन्नई, तिरुवल्लूर कांचीपुरम आणि चेंगलपेट जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालये सोमवार आणि मंगळवारी बंद राहतील असे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी रविवारी जाहीर केले. चेन्नईतील पुरसावलकम, पाडी आणि कोलाथूर सारख्या पावसाने प्रभावित भागाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी सर्व आपत्कालीन परिस्थितींसाठी मनुष्यबळ आणि यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे असे सांगितले. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांना शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर केली. tamil Nadu chief minister M K Stalin chennai rain holidays decleared for school and colleges

आगामी काळात आणखी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी नागरिकांना आवश्यकता असेल तरच प्रवास करावा अन्यथा प्रवासाचा बेत तीन दिवस स्थगित ठेवावा असे आवाहन केले.

School
एसटी कर्मचारी संपावर; हजाराे प्रवासी खाेळंबले

दरम्यान पावसामुळे बाधित झालेल्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकार सर्व उपाययोजना करत आहे. शहरातील सुमारे ४४ पुनर्वसन केंद्रांत सकाळपासून सुमारे ५० हजार अन्न पाकिटांचे वाटप करण्यात आले आहे. सुमारे १६० केंद्रे तयार आहेत. पाचशे ठिकाणी पंप तयार ठेवण्यात आले आहेत. मदुराई आणि कुड्डालोर येथे एनडीआरएफच्या चार पथके पाठवण्यात आली आहेत असेही स्टॅलिन यांनी नमूद केले.

सर्व विद्युत खांब सतत देखरेखीखाली आहेत. अधिकाऱ्यांना आवश्यक पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत. जलमय भागातील नागरिकांनी सावध रहावे. वाहन घेऊन सखल भागात जाऊ नये असे आवाहन स्टॅलिन यांनी करुन अधिकारी २४ तास सतर्क असून सर्व विभाग समन्वयाने काम करत असल्याचे सांगितले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com