Chennai News: खळबळजनक! NEET परीक्षेतील अपयशानंतर १९ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या; पुत्रविरहात वडिलांनीही संपवले आयुष्य

CM MK Stalin On Neet Exam: या दुर्देवी घटनेनंतर तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के स्टॅलिन यांनी नीट परीक्षा बंद करण्याबाबत ठोस निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे.
Chennai News
Chennai NewsSaamtv
Published On

Tamil Nadu News: तमिळनाडूची राजधानी चेन्नईमधून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. नीट परिक्षेत दोन वेळा अपयश आल्याने १९ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली. धक्कादायक म्हणजे मुलाच्या मृत्यूनंतर काही तासांत वडिलांनीही आपले आयुष्य संपवले. या ह्रदयद्रावक घटनेने परिसरात खळबळ एकच उडाली आहे.

Chennai News
Jalgaon Bus Accident: बसचा मोठा अपघात टळला..धावत्या बसचा रॉड तुटला; चालकामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 

याबाबत अधिक माहिती अशी की, 19 वर्षीय एस जेगेश्वरनने 2022 मध्ये बारावी पूर्ण केली होती. तेव्हापासून तो दोनदा NEET परीक्षेला बसला होता. मात्र दोन्ही वेळा तो अपयशी ठरला होता. याच नैराश्यातून जेगेश्वरनने शनिवारी दुपारी घरात एकटा असताना आत्महत्या केली. जगडेश्वरन यांचे वडील सेलवसेकर सतत फोन करत होते.पण संपर्क होऊ शकला नाही.

यानंतर त्यांनी घरातील नोकराला खोलीत जाऊन पाहण्यास सांगितले. यानंतर घरकामगार खोलीत गेले असता, जेगेश्वरन यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यादरम्यान घरातील नोकराने शेजाऱ्यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर घाईघाईत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

Chennai News
Latur Accident News: काळीज पिळवटून टाकणारी घटना! बस आणि दुचाकीचा भीषण अपघात; माय- लेकाचा मृत्यू

दोनदा परीक्षा उत्तीर्ण होऊ न शकल्याने निराश झाल्याने आपल्या मुलाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे जगडेश्वरनच्या पालकांनी सांगितले. मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वडिल सेलवसेकर यांनीही गळफास घेवून आत्महत्या करत आयुष्य संपवले.

मुख्यमंत्र्यांनी केला शोक व्यक्त...

याबाबत बोलताना तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के स्टॅलिन (M. K. Stalin) यांनी त्याच्या आई-वडिलांचे सांत्वन कसे करायचे याचा विचार करत असतानाच दुसऱ्या दिवशी त्याचे वडील सेलवसेकर यांनीही आत्महत्या केली. जगदीश्वरन यांचे कुटुंब, मित्र आणि नातेवाईक यांचे सांत्वन कसे करावे हे मला कळत नाही... अशी भावूक प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

परिक्षाच रद्द करण्याचा निर्णय..

तसेच या धक्कादायक घटनेनंतर मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी "कोणीही कोणत्याही परिस्थितीत आपला जीव गमावू नये. तुमच्या ध्येयांमध्ये अडथळा ठरणारी NEET आम्ही नक्कीच काढून टाकू शकतो. तमिळनाडू सरकार या दिशेने काम करत आहे," आणि कायदेशीर पावले उचलत असल्याची घोषणा केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com