Diwali Gifts : मालक असावा तर असा! दिवाळी गिफ्ट म्हणून दिल्या कार-बाईक, एवढे कोटी केले खर्च

ज्वेलरी शॉपचे मालक जयंती लाल यांनी त्यांच्या कर्मचार्‍यांना दिवाळी भेट म्हणून बाइक आणि कार दिल्या आहेत.
Diwali Gift
Diwali GiftSaamTV
Published On

चेन्नई : दरवर्षी दिवाळीनिमित्त (Diwali 2022) कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना भेटवस्तू आणि बोनस देतात. अनेक मोठमोठ्या कंपन्या आपल्या कंपन्यांना गिफ्ट्स देतात मात्र कर्मचाऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे ते असतातच असं नाही. दुसरीकडे, तामिळनाडूतील एका ज्वेलरी शॉपच्या मालकाने आपल्या कर्मचाऱ्यांना अशी भेट दिली की सगळेच अवाक् झाले. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. ज्वेलरी शॉपचे मालक जयंती लाल यांनी त्यांच्या कर्मचार्‍यांना दिवाळी भेट म्हणून बाइक आणि कार दिल्या आहेत.

Diwali Gift
एक तरुणी दोन सख्ख्या भावांच्या प्रेमात; लोकांना आठवला 'गुंडे' चित्रपट

ज्वेलरी शॉप मालक ज्याने दिवाळीच्या आधी आपल्या कर्मचार्‍यांना कार आणि बाईक भेट देऊन एक मालक कसा असावा याचं उत्तम उदाहरण तयार केलं आहे. ज्वेलरी शॉपचे मालक जयंती लाल म्हणाले की, माझ्या सर्व चढ-उतारांमध्ये कर्मचाऱ्यांनी मला साथ दिली. हे त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी आहे. आम्ही 10 जणांना कार आणि 20 जणांना बाईक भेट दिली आहे. (Latest News Update)

जयंती लाल म्हणाले की, माझे कर्मचारी कुटुंबासारखे वागले. ते फक्त कर्मचारी नाहीत तर माझे कुटुंब आहेत. अशा परिस्थितीत मलाही अशा भेटवस्तू देऊन माझ्या कुटुंबियांप्रमाणे वागायचे आहे. मी खूप आनंदी आहे. प्रत्येक बॉसला त्याच्या कर्मचार्‍यांचा अभिमान वाटला पाहिजे.

Diwali Gift
Viral : हत्ती जंगलात शांतपणे उभा होता, वाघ शिकार करणार तोच... पाहा थरारक VIDEO

1.2 कोटी रुपयांचे गिफ्ट्स

कर्मचारी आणि सहकाऱ्यांना दिलेल्या या भेटवस्तूंची किंमत सुमारे 1.2 कोटी रुपये आहे. चलानी ज्वेलर्स नावाच्या दुकानाचे मालक जयंत लाल यांनी जेव्हा या भेटवस्तूंची घोषणा केली तेव्हा काही कर्मचाऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला तर काहींच्या चेहऱ्यावर आनंदाचे अश्रू होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com