Supreme Court : सर्वोच्च न्यायालयात ५ न्यायाधीशांच्या नियुक्ती; कॉलेजियमच्या शिफारसीवर केंद्र सरकारचं शिकामोर्तब

सर्वोच्च न्यायालयात ५ नव्या न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे
Supreme Court of India
Supreme Court of IndiaSaam TV
Published On

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात ५ नव्या न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायाधीशांच्या नियुक्तीमुळे केंद्र सरकारच्या कॉलेजिअमच्या शिफारस मंजूर केल्याचे आज, शनिवारी सांगण्यात आले. 3 डिसेंबर रोजी भारताचे मुख्य न्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली कॉलेजियमने ५ नावांची शिफारस केली.

न्यायमूर्ती पंकज मिथल ((राजस्थान उच्च न्यायालयचे मुख्य न्यायाधीश), न्यायमूर्ती संजय करोल (पटना उच्च न्यायालयचे मुख्य न्यायाधीश), न्यायमूर्ती पी वी संजय कुमार ( मणिपूर उच्च न्यायालयचे मुख्य न्यायाधीश), न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्लाह (न्यायाधीश, पटना उच्च न्यायालय) आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा (न्यायाधीश, अलाहाबाद उच्च न्यायालय) यांची नियुक्त करण्यात आली आहे.

3 डिसेंबरला भारताचे मुख्य न्यायाधीश डी वाय चंद्रचूड़ यांच्या अध्यक्षते खालील कॉलेजियम ने ५ नावांची शिफारस केली. न्यायमूर्ती पंकज मिथल, न्यायमूर्ती संजय करोल, न्यायमूर्ती पी वी संजय कुमार, न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्लाह, न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या नियुक्तीची शिफारस केली होती.

या शिफारसीला केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. या शिफारसीला केंद्र सरकारने (Central Government) मंजूरी दिली आहे. आता सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ३२ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकार आणि कॉलेजिअम मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश नियुक्तीवरून वाद सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर या नियुक्तीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

Supreme Court of India
Sharad Pawar : शरद पवार यांनी सांगितला भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा 'तो' किस्सा; म्हणाले...

केंद्र सरकारने या पाच न्यायाधीशांच्या पदोन्नतीसाठी कॉलेजियमच्या प्रलंबित शिफारशी रविवारपर्यंत जाहीर केल्या जातील असे सांगितले होते. यानंतर आज, शनिवारी आज राष्ट्रपतींनी (President) कॉलेजियमच्या शिफारशींना मंजुरी दिली आहे. हे पाच न्यायमूर्ती सोमवारी सर्वोच्च शपथ घेण्याची शक्यता आहे. यानंतर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ३२ झाली आहे. उर्वरित दोन शिफारशींवर पुढील आठवड्यात नियुक्त्या होऊ शकतात.

Supreme Court of India
Viral Video: उत्तर प्रदेशमध्ये नग्न महिलेची भीती; रात्रीच्या अंधारात डोअरबेल वाजवून गायब, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

दरम्यान, राष्ट्रपतींनी मंजुरी दिल्यानंतर पाच न्यायाधीशांच्या नियुक्तीवर केंद्र सरकारनेही शनिवारी शिक्कामोर्तब केले. हे पाच न्यायाधीश सध्या देशातील विविध न्यायालयात सध्या कार्यरत आहेत.न्यायाधीश निवडीच्या कॉलेजियम पद्धतीवर आक्षेप घेणारे केंद्रीय कायदा मंत्री किरन रिजिजू यांनी सर्वोच्च न्यायालयातील नवनियुक्त पाच न्यायाधीशांना ट्विट करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com