Satya Pal Malik On CBI Summons : माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satya pal Malik) प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. सीबीआयने समन्स बजावल्यानंतर पहिल्यांदाच सत्यपाल यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे.
सीबीआयच्या कार्यालयात मी जाणार नाही. तर सीबीआयचे अधिकारी स्वतः भेटण्यासाठी घरी येणार आहेत, असे सत्यपाल मलिक यांनी सांगितले. (Latest Marathi News)
सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केल्यानंतर देशातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. विविध कार्यक्रमांत त्यांच्याकडून अनेक वक्तव्ये केली जात आहेत. त्याचदरम्यान, सत्यपाल यांना सीबीआयने समन्स बजावल्याचे वृत्त येऊन धडकले. त्यानंतर काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या नेत्यांकडून केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे.
सीबीआयने समन्स बजावल्याच्या वृत्तानंतर सत्यपाल मलिक यांनी यासंदर्भात स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यानंतर या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. सीबीआयने समन्स बजावले नसून, त्यांनी माझ्याकडे स्पष्टीकरण मागितले आहे. सीबीआयकडून कोणतेही समन्स बजावण्यात आले नाही. ही अफवा आहे, असे ते म्हणाले.
मलिक यांनी एका हिंदी वृत्तसंकेतस्थळाशी बोलताना सांगितले की, सीबीआयचे अधिकारी त्यांच्या घरी येणार आहेत. संबंधितांशी चर्चा झाली आहे. त्यांना स्पष्टीकरण हवे आहे. दरम्यान, या प्रकरणात सीबीआयकडून २७ किंवा २८ एप्रिलची वेळ मागितली होती. या दिवशी सत्यपाल हे राजस्थानमध्ये असतील असे सांगितले जाते. त्यामुळे २८ एप्रिल किंवा त्यानंतर सीबीआयचे अधिकारी त्यांच्या निवासस्थानी जाण्याची शक्यता आहे.
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या नावाने असलेल्या वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट शेअर केल्या जात आहेत. शुक्रवारी ज्या सोशल मीडिया हँडलवरून पोस्ट केली गेली होती, ती सपशेल खोटी आहे.
हे अकाउंट माझ्या नावाने अन्य कुणीतरी वापरत आहेत. त्याच अकाउंटवरून सीबीआयकडून समन्स बजावण्यात आल्याची पोस्ट शेअर करण्यात आली. अशा प्रकारचे माझ्या नावाने असलेले सोशल मीडिया अकाउंट बोगस आहेत, असे मलिक यांनी सांगितले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.