मोठी बातमी! बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाच्या दोन नेत्यांच्या घरांवर सीबीआयने टाकले छापे

राष्ट्रीय जनता दलाचे आमदार सुनील सिंह यांच्या घरावर केंद्रीय अन्वेषण विभागाने आज छापा टाकला आहे.
cbi news Bihar
cbi news Bihar Saam Tv
Published On

पाटणा: केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) आज सकाळपासून राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) चे दोन नेते, खासदार अश्फाक करीम आणि आमदार सुनील सिंह यांच्या घरावर छापा टाकला आहे. या छापेमारीवर आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत "हे जाणूनबुजून केले जात आहे. यात काही अर्थ नाही. आमदार आपल्या पक्षात येण्यासाठी ही भीती दाखवली जात आहे,

cbi news Bihar
ट्रॅफिक टाळण्यासाटी बाईक विरुद्ध दिशेला घेणं तरुणाच्या जीवावर बेतलं; टॅंकरने जागीच चिरडलं

सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव, त्यांची पत्नी राबडी देवी आणि त्यांची मुलगी हेही आरोपी आहेत. हा घोटाळा लालूप्रसाद यादव यांच्या यूपीए-1 सरकारमधील रेल्वेमंत्री काळातील आहे.

cbi news Bihar
बिहार सरकारचे भवितव्य आज ठरणार, तेजस्वी यादव यांनी आमदारांसाठी व्हीप केला जारी

बिहार सरकारचे भवितव्य आज ठरणार

बिहारमध्ये (Bihar) मागिल काही दिवसापासून राजकीय उलथापालत सुरू आहे. नितीश कुमार यांनी भाजपसोबत युती तोडत राष्ट्रीय जनता दलासोबत सरकार स्थापन केले आहे. आजचा दिवस या सरकारसाठी महत्वाचा आहे. आज २४ ऑगस्टपासून विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन सुरू होत आहे. यादरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सरकार सभागृहात विश्वासदर्शक ठराव मांडणार आहे. त्यामुळे आजचा दिवस या सरकारसाठी महत्वाचा आहे.

दुसरीकडे विधानसभा अध्यक्षपदावरुन दोन्हीकडून रस्सीखेच सुरू आहे. सभापती विजय सिन्हा आपले पद सोडतात की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पदाचा राजीनामा न दिल्यास सत्ताधारी पक्ष त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणू शकतो. या सगळ्या दरम्यान उपमुख्यमंत्री आणि आरजेडी विधीमंडळ पक्षाचे नेते तेजस्वी यादव यांनी राष्ट्रीय जनता दलाच्या सर्व आमदारांसाठी व्हिप जारी केला आहे. सर्व आमदारांना सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यापासून ते शेवटपर्यंत उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (Bihar Political News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com