Caste Census: ठरलं! देशात २ टप्प्यात होणार जातनिहाय जनगणना, तारखा आल्या समोर

Caste Census Dates Announced: जातनिहाय जनगणनेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. दोन टप्प्यामध्ये जातनिहाय जनगणना होणार आहे. पहिला टप्पा १ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होईल आणि दुसरा टप्पा १ मार्च २०२७ पासून सुरू होईल.
Caste Census: ठरलं! देशात २ टप्प्यात होणार जातनिहाय जनगणना, तारखा आल्या समोर
Caste Census
Published On

देशातील जातनिहाय जनगणनेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. जातनिहाय जनगणनेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. भारतात जातनिहाय जनगणना दोन टप्प्यात केली जाणार आहे. पहिला टप्पा १ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होईल आणि दुसरा टप्पा १ मार्च २०२७ पासून सुरू होईल. विरोधीपक्षाकडून गेल्या अनेक वर्षांपासून जातनिहाय जनगणनेची मागणी केली जात होती. अखेर केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेची तारीख जाहीर केली आहे.

भारतामध्ये पहिल्या टप्प्यातील जातनिहाय जनगणना १ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होईल. पहिल्या टप्प्यात चार राज्यांचा समावेश असणार आहे. यामध्ये उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, लडाख आणि जम्मू-काश्मीर यांचा समावेश आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील जातनिहाय जनगणना १ मार्च २०२७ पासून सुरू होईल. केंद्र सरकारकडून जातनिहाय जनगणनेची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.

Caste Census: ठरलं! देशात २ टप्प्यात होणार जातनिहाय जनगणना, तारखा आल्या समोर
Caste Census : अखेर ठरलं ! सरकार जातनिहाय जनगणना करणार, काँग्रेसकडून स्वागत; प्रतिक्रिया देत म्हणाले...

स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच जातनिहाय जनगणना होणार आहे. जनगणनेसोबतच जातनिहाय जनगणनाही केली जाणार आहे. मागच्या महिन्यात मोदी सरकारने जातनिहाय जनगणनेला मान्यता दिली होती. १९३१ नंतर भारतात जातनिहाय जनगणना झालेली नाही. तर देशात दर १० वर्षांनी जनगणना केली जाते. शेवटची जनगणना २०११ मध्ये झाली होती. नियमांनुसार, जनगणना २०२१ मध्ये होणार होती परंतु कोविडमुळे जनगणना होऊ शकली नव्हती.

Caste Census: ठरलं! देशात २ टप्प्यात होणार जातनिहाय जनगणना, तारखा आल्या समोर
Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना, केंद्रीय कॅबिनेटचा निर्णय; सर्वोच्च न्यायालयाचा उल्लेख करत प्रकाश आंबेडकरांची मोठी प्रतिक्रिया

दरम्यान, केंद्र सरकारकडून जातनिहाय जनगणनेत डिजिटल पद्धतींचाही अवलंब केला जाणार आहे. डिजिटल वापरामुळे वेळ वाचेल आणि अचूकताही वाढेल. जातनिहाय जनगणनेची प्रक्रिया सुमारे ३ वर्षांत पूर्ण होईल. या प्रक्रियेला पूर्वी सुमारे ५ वर्षे लागायचे. भारताची जनगणना १९४८ च्या जनगणना कायदा आणि १९९० च्या जनगणना नियमांच्या तरतुदींनुसार केली जाते. भारताची शेवटची जनगणना २०११ मध्ये दोन टप्प्यात करण्यात आली होती. त्यानंतर आता ही जनगणना केली जात आहे.

Caste Census: ठरलं! देशात २ टप्प्यात होणार जातनिहाय जनगणना, तारखा आल्या समोर
Caste Census: जातनिहाय जनगणना का आहे महत्त्वाची? याआधी कधी झाली होती जनगणना, जाणून घ्या फायदे-तोटे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com