Canada vs India: भारताचा कॅनडाला आणखी एक दणका, दुतावासातील ४० कर्मचाऱ्यांना माघारी बोलावण्यासाठी ७ दिवसांचा अल्टिमेटम

Canada Political News: सध्या कॅनडाचे ६२ राजकीय कर्मचारी भारतात आहेत.
Canada vs India
Canada vs IndiaSaam Tv

Canada vs India News:

खलिस्तानी नेत्याच्या हत्येवरून कॅनडा आणि भारताचे संबंध काही दिवसांपासून खूपच ताणले आहेत. त्यातच आता भारताने कॅनडाला त्याच्या भारतातील ४० राजकीय कर्मचाऱ्यांना माघारी बोलावण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या दोन्ही देशांचे संबंध आणखीन बिघडण्याची शक्यता आहे. (Latest Canada Vs India News)

Canada vs India
Slowest Traffic In India : वाहतूक कोंडीत देशात भिवंडी ५व्या स्थानी; टॉप १० मध्ये महाराष्ट्रातील आणखी २ प्रमुख शहरं

सध्या कॅनडाचे ६२ राजकीय कर्मचारी भारतात आहेत. त्यातील ४१ कर्मचाऱ्यांना परत बोलावण्यास या आधीच सांगितले असून कॅनडात परत बोलावण्यासाठी 10 ऑक्टोबरची अंतिम मुदत देण्यात आलेय.

भारताने आतंकवादी घोषित केलेल्या खलिस्तानी फुटीरतावादी हरदीप सिंग निज्जरची काही दिवसांपूर्वी कॅनडात हत्या करण्यात आली होती. कॅनडाने या हत्येमागे भारताचा हात असल्याचा दावा केला होता. दरम्यान या आरोपांचे खंडन करताना भारताने कॅनडाची भारतातील राजकीय उपस्थिती कमी करण्याच्या सूचना केल्या आणि दोन्ही देशांचे संबंध अधिकच ताणले.

राजकीय उपस्थितीत समतोल असण्याची आवशक्यता

यासंदर्भात बोलताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले होते की नवी दिल्लीतील कॅनडाच्या राजनैतिक कर्मचार्‍यांची संख्या अधिक आहे. दोन्ही देशांमधील एकमेकांच्या राजकीय उपस्थितीत समतोल असणे आवश्यक आहे.परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी कॅनडाचे आरोप मूर्खपणाचे असल्याचे म्हणत फेटाळून लावले. तसेच यापूर्वी कॅनडातील भारतीय मुत्सद्द्यांविरुद्ध “हिंसेचे वातावरण” आणि “धमकीचे वातावरण” असल्याचे म्हटले आहे.

काय होईल परिणाम?

कॅनडा आणि भारत यांच्यातील वाढत्या तणावाचा परिणाम दोन्ही देशांवर होईल, कारण हे दोन्हीही देश अनेक गोष्टींसाठी एकमेकांवर अवलंबून आहेत. एकमेकांवरील आरोप प्रत्यारोपांमुळे शेअर बाजारावर परिणाम दिसू लागला आहेच. शिवाय याचा परिणाम बाजारपेठेवर होण्याची शक्यता आहे. डाळी महाग होण्याची शक्यता आहे. शिवाय हा वाद सुरू झाल्यापासून विद्यार्थ्यांचं पण टेंशन वाढलंय.

Canada vs India
Gautam Adani Billionaire List: जगातील टॉप 10 अब्जाधीशांच्या यादीतून गौतम अदानी 'आऊट', अंबानी कुठल्या स्थानी?

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com