IQ Test
IQ Test Saam TV

पोरानं नाव काढलं! 11 वर्षीय मुलाने आइनस्टाईन-हॉकिंग यांनाही टाकलं मागं, बुद्धीमत्तेची जगभरात होतेय चर्चा

युसूफ शाह असं या मुलाचं नाव असून तो विग्टन मूर प्रायमरी स्कूलचा विद्यार्थी आहे.
Published on

लंडन : बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, असं म्हणतात. ब्रिटनमधील एक लहान मुलगा त्याने केलेल्या ऐतिहासिक कामगिरीमुळे चर्चेत आला आहे. ब्रिटनमधील एका 11 वर्षाच्या मुलाने इतिहास रचला आहे. त्याला मेन्सा IQ टेस्टमध्ये (Mensa IQ Test ) 162 गुण मिळाले आहेत. असा दावा केला जात आहे की त्याने अल्बर्ट आइनस्टाईन आणि स्टीफन हॉकिंग यांनाही मागे टाकले आहे. आइन्स्टाईन आणि हॉकिंग यांचा बुद्ध्यांक 160 च्या जवळपास असल्याचा अंदाज आहे. युसूफ शाह असं या मुलाचं नाव असून तो विग्टन मूर प्रायमरी स्कूलचा विद्यार्थी आहे. (Latest Marathi News)

IQ Test
काळजाचा थरकाप उडवणारी घटना; प्रेयसीची हत्या करत शरीराचे केले ३५ तुकडे

न्यू यॉर्क पोस्टनुसार, शाह आणि त्याच्या पालकांनी ठरवलं होतं की हायस्कूलची तयारी करत असतानाच ते मेन्सा परीक्षेचीही तयारी करतील. दोघांचा अभ्यासक्रम जवळपास सारखाच आहे. त्याचे वडील इरफान शाह म्हणाले, 'यासाठी तयारी करणे कठीण आहे. आम्ही आधीपासून जे करत होतो ते आम्ही केले. IQ टेस्टसाठी काही विशेष केले नाही.

युसूफचे वडील इरफान यांनी सांगितले की, त्यांच्या मुलाला ऑक्सफर्ड किंवा केंब्रिज विद्यापीठात गणिताचा अभ्यास करायचा आहे. त्यांच्या मते, युसूफमध्ये लहानपणापासूनच विशेष गुण दिसत होते. पाळणाघरातही आम्ही पाहिले की तो इतर मुलांपेक्षा लवकर अक्षरे आणि गोष्टी करत असे. तो गणितात खूप हुशार आहे.

IQ Test
Video : तुर्कस्तानची राजधानी स्फोटाने हादरली, ४ जणांचा मृत्यू; भयानक Video आला समोर

परीक्षेच्या एका भागादरम्यान, युसूफला सांगण्यात आले की त्याला तीन मिनिटांत 15 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत, परंतु त्याने ते 13 मिनिटांत चुकून ऐकले आणि त्यामुळे प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी वेळ लागला. असे असूनही युसूफने चांगली कामगिरी केली. मला कधी वाटलं नव्हतं की मी बातम्यांमध्ये येईन, अशी प्रतिक्रिया युसूफने दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com