हा इंडिया आघाडीच्या 300 खासदारांचा एल्गार सरकारविरोधात नाही... तर हा एल्गार आहे थेट निवडणूक आयोगाविरोधात... मात्र खासदारांनी संसद भवनापासून काढलेला मोर्चा निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत पोहचण्याआधीच अडवण्यात आला... आणि खासदारांना ताब्यात घेण्यात आलंय.. तर ही संविधान वाचवण्यासाठीची लढाई असल्याचा दावा राहुल गांधींनी केलाय...
लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडी विखुरल्याचं चित्र होतं.. ममता बॅनर्जींचं पुर्वेला, ठाकरेंचं पश्चिमेला, स्टॅलिन यांचं दक्षिणेला तर राहुल गांधींचं उत्तरेला तोंड असल्याची खिल्ली उडवली जात होती...मात्र विखुरलेली इंडिया आघाडी पुन्हा एकत्र झालीय... आणि त्याला कारण ठरलंय बोगस मतदान...राहुल गांधींनी पुराव्यासह बोगस मतदानाचा पर्दाफाश केला आणि आयोगाविरोधात देशभरातून संतापाची लाट उसळली
तर राहुल गांधींनी फक्त कर्नाटकच नाही तर महाराष्ट्रातही 1 कोटी बोगस मतदार आढळल्याचा आरोप केलाय. विशेष म्हणजे ही लढाई फक्त पत्रकार परिषदेपुरतीच न ठेवता रस्त्यावरुनही रणशिंग फुंकलंय...दुसरीकडे याच मुद्द्यावर इंडियाची मोट बांधण्यासाठी राहुल गांधींनी हालचाली सुरु केल्या आहेत. गेल्या काही दिवसातल्या घडामोडी पाहूयात
6 ऑगस्ट
दिल्लीत काँग्रेसच्या कार्यालयात मतचोरीवर सादरीकरण
6 ऑगस्ट
प्रकाश आंबेडकरांसारख्या टीकाकारांकडूनही राहुल गांधींचं कौतूक
7 ऑगस्ट
डिनर डिप्लोमसीतून 25 पक्षांच्या 50 नेत्यांपुढे सादरीकरण
8 ऑगस्ट
कर्नाटकातून व्होट अधिकार रॅलीतून रस्त्यावर संघर्ष
11 ऑगस्ट
संसद भवन ते निवडणूक आयोग कार्यालयापर्यंत इंडियाच्या खासदारांचा मोर्चा
बिहारच्या निवडणुकीआधी राहुल गांधींनी बोगस मतदानाच्या मुद्द्यावर फक्त इंडिया आघाडीची मोटच बांधली नाही.... तर या आघाडीचं नेतृत्वही आपल्याकडे घेतलंय.. त्यामुळे गांधींकडून बिहार विधानसभा निवडणूक, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आणि उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक असे एकाच दगडात तीन पक्षी मारण्याची शक्यता आहे.... मात्र बोगस मतदानाच्या मुद्द्याने इंडिया आघाडीला पुनरुज्जीवन दिलंय.. एवढं मात्र निश्चित....
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.