Electoral Bonds: 'देशात काळा पैसा परत येणार', इलेक्टोरल बाँड्स रद्द झाल्यानंतर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया

Amit Shah News: सर्वोच्च न्यायालयाने इलेक्टोरल बाँड योजना रद्द केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Amit Shah
Amit Shah saam tv
Published On

Amit Shah On Electoral Bonds:

सर्वोच्च न्यायालयाने इलेक्टोरल बाँड योजना रद्द केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अमित शाह म्हणाले की, काळा पैसा संपवण्यासाठी इलेक्टोरल बाँड आणण्यात आले. इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना अमित शाह म्हणाले की, आता ही योजना रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे काळा पैसा परत येण्याची चिंता असेल.

वर्ष 2018 मध्ये सुरू करण्यात आलेली केंद्र सरकारची ही योजना सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात रद्द केली होती. अमित शाह म्हणाले की मी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर भाष्य करू इच्छित नाही. मात्र इलेक्टोरल बाँड योजनेवर चर्चा करण्यास तयार आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Amit Shah
Electoral Bonds: इलेक्टोरल बाँड्सची एसआयटी चौकशी करा, तोपर्यंत भाजपच्या बँक खात्यातील व्यवहारांवर बंदी घालावी; खरगे यांची मागणी

ते म्हणाले की, योजनेच्या अंमलबजावणीपूर्वी पक्षांना देणगी रोखीने दिली जात होती. मात्र योजना लागू झाल्यानंतर कंपन्या किंवा व्यक्तींना पक्षांना देणगी देण्यासाठी बाँड खरेदी करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेकडे धनादेश जमा करावा लागत होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, "भाजप सत्तेत असल्यामुळे इलेक्टोरल बाँड योजनेचा फायदा झाला.''  (Latest Marathi News)

इतर पक्षांच्या टीकेला उत्तर देताना केंद्रीय अमित शाह म्हणाले की, "भाजपला इलेक्टोरल बाँड्सच्या माध्यमातून सुमारे 6,000 कोटी रुपये मिळाले. एकूण बाँडची रक्कम 20,000 कोटी रुपये होती. ज्यात सर्व पक्षांचा हिस्सा आहे. मग 14,000 रुपयांचे बाँड कुठे गेले?"

Amit Shah
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी सपाची तिसरी यादी जाहीर, टीएमसीला दिल्या इतक्या जागा

अमित शाह यांनी आपल्या वक्तव्यात इतर पक्षांच्या खात्यांचाही उल्लेख केला. इलेक्टोरल बाँड्सच्या माध्यमातून तृणमूल काँग्रेसला 1600 कोटी रुपये, काँग्रेसला 1400 कोटी रुपये, भारत राष्ट्र समितीला 1200 कोटी रुपये, बीजेडीला 775 कोटी रुपये आणि द्रमुकला 649 कोटी रुपये मिळाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com