Rahul Gandhi: राहुल गांधींच्या छातीत गोळी घालू;भाजप प्रवक्त्याची उघड धमकी

Political Hate at Peak: राहूल गांधींना गोळ्या घालू, अशी खुली धमकीच भाजप प्रवक्त्याने दिलीय... मात्र त्याचं कारण काय? भाजप प्रवक्त्याच्या धमकीनंतर काँग्रेसनं काय प्रतिक्रिया दिलीय? आणि देशात एवढा राजकीय द्वेष का वाढत चाललाय?
BJP spokesperson Pintu Mahadevan sparks outrage after openly threatening Rahul Gandhi with gun violence during a live TV debate.
BJP spokesperson Pintu Mahadevan sparks outrage after openly threatening Rahul Gandhi with gun violence during a live TV debate.Saam Tv
Published On

राहुल गांधी व्होट चोरी आणि लडाखमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावर मोदी सरकारविरोधात आक्रमक झालेत.. त्यातच आता भाजप प्रवक्त्याने थेट लाईव्ह टीव्ही डिबेटमध्येच राहुल गांधींच्या छातीत गोळी घालून जीवे मारण्याची धमकी दिलीय.. त्यामुळे देशात एकच खळबळ उडालीय.. मात्र टीव्ही डिबेट शोमध्ये नेमकं काय घडलं?

लडाखमधील हिंसाचार आणि निषेध प्रदर्शनांवर मल्याळम वृत्तवाहिनीवर चर्चा

लडाखमधील परिस्थितीला भाजप आणि RSS जबाबदार असल्याचा काँग्रेसचा

काँग्रेसच्या आरोपाने भाजप प्रवक्ता दुखावला

राहुल गांधीं असेच वागत राहिल्यास छातीत गोळी घालणार, भाजप प्रवक्ता पिंटू महादेवनची धमकी

भाजप प्रवक्त्याने अत्यंत विखारी वक्तव्य केल्यानंतर काँग्रेस आक्रमक झालीय.. तर के सी वेणूगोपाल यांनी अमित शाहांना पत्र लिहून भाजप प्रवक्ता पिंटू महादेवनवर कारवाईची मागणी केलीय.. तर राहुल गांधींच्या केसालाही हात लावण्याची हिंमत भाजपमध्ये नसल्याचा पलटवार काँग्रेसने केलाय..

खरंतर 1984 मध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांच्या बॉडीगार्डनेच त्यांची गोळ्या झाडून हत्या केली... तर 1991 मध्ये तामिळनाडूच्या पेरंबुदुरमध्ये LTTE या दहशतवादी संघटनेनं आत्मघातकी बॉम्बने राजीव गांधींची हत्या केली.. त्यानंतर एकूणच गांधी कुटुंबाची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा राहुल गांधींना जीवे मारण्याची भाषा जाहीरपणे वापपली जातेय आणि तीही सत्ताधारी भाजप प्रवक्त्याकडून.. त्यामुळे अशी जहाल आणि विखारी भाषा वापरणाऱ्या प्रवक्त्यांवर नेमकी काय कठोर कारवाई होणार...? याकडे देशाचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com