Basavraj Bemmai
Basavraj Bemmai Saam TV

Karnataka CM : सीमावाद उकरुन काढणारे मुख्यमंत्री बोम्मई अडचणीत? CM पदावरुन हटवण्याची शक्यता

ॲंटी इन्कम्बसी टाळण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री बस्वराज बोम्मई यांची गच्छंती होणार असल्याचं बोललं जात आहे.
Published on

बंगळुरु : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राबाबत गरळ ओकणार कर्नाटकचे मुख्यमंत्री बदलले जाणार असल्याची चर्चा आहे. दिल्लीत सुरू असणाऱ्या भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्यात झालेल्या चर्चेनंतर या चर्चांना उधाण आलं आहे.

Basavraj Bemmai
Latur ST Bus Accident : लातुरात एसटी चालकाचा बसवरील ताबा सुटून भीषण अपघात; ३० प्रवासी जखमी

लिंगायत समुदायाचा पाठिंबा असलेल्या येडीयूराप्पा आगामी निवडणुकीत मुख्य भूमिकेत असणार आहेत. ॲंटी इन्कम्बसी टाळण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री बस्वराज बोम्मई यांची गच्छंती होणार असल्याचं बोललं जात आहे. (Latest Marathi News)

Basavraj Bemmai
Sanjay Raut : शिवसेना कोणाची? निवडणूक आयोगाच्या निकालाआधी संजय राऊत रोखठोक बोलले

कर्नाटकात मे महिन्यात निवडणुका होणार आहेत. निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसे येडियुरप्पा यांचे पक्षातील महत्त्व वाढत आहे. ते पक्षाच्या संसदीय मंडळावरही आहेत. लिंगायत समाजाचा पाठिंबा त्यांच्या पाठीशी आहे.

कर्नाटकात पक्ष पुन्हा येडियुरप्पा यांना आपला चेहरा बनवू शकतो. दुसरीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे महाराष्ट्रासोबतच्या सीमावादात अडकले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com