Nitin Gadkari : आम्ही कोणी साधू-संन्यासी नाहीत, प्रत्येक नेता...; नितीन गडकरी यावेळी अधिकच स्पष्ट बोलले

Nitin Gadkari News : प्रत्येक नेता पुढील निवडणुकांचा विचार करत असतो. आम्ही लोक राजकारणात आलोय. आम्ही कोणी साधू-संन्यासी नाहीत.
Nitin Gadkari Latest News
Nitin Gadkari Latest News SAAM TV

Nitin Gadkari Latest News In Marathi : केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी आपल्या रोखठोक वक्तव्यामुळं नेहमीच चर्चेत असतात. आता पुन्हा अशाच एका विधानामुळं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

प्रत्येक नेता पुढील निवडणुकांचा विचार करत असतो. आम्ही लोक राजकारणात आलोय. आम्ही कोणी साधू-संन्यासी नाहीत. आम्ही निवडणुका जिंकण्यासाठी आलो आहोत. चांगलं काम केलं तर, निवडणुका जिंकू, असं नितीन गडकरी म्हणाले.

Nitin Gadkari Latest News
Turkey Earthquake Video : 'मला वाचवा...; जीवाच्या आकांताने ओरडतोय ढिगाऱ्याखाली अडकलेला तरुण, पाहा व्हिडिओ

'बजेट आज तक'च्या कॉन्क्लेव्हमध्ये नितीन गडकरी (Nitin Gadkari) बोलत होते. यावेळी इलेक्ट्रीक वाहने, एक्स्प्रेस वे, अर्थसंकल्पावर त्यांनी भाष्य केले. तसेच २०२४ मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांच्या रणनीतीवरही त्यांनी सविस्तर माहिती दिली.

Nitin Gadkari Latest News
DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच गुड न्यूज मिळणार! महगाई भत्यात 4 टक्के वाढीची शक्यता; पगार किती वाढेल?

२०२४ मधील निवडणुकांच्या आधी मोफत धान्य, कर सवलतींवर कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्नाला गडकरी यांनी उत्तर दिले.

प्रत्येक नेता आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवतो. राजकारणात आम्ही आलोय. आम्ही कोणी साधू-संन्यासी नाही. निवडणुका जिंकण्यासाठी राजकारणात येतो. चांगलं काम केलं तर जिंकणार. जे चांगलं काम करेल, जनता त्यांना निवडेल. प्रत्येक पक्ष तसाच आहे. आम्ही त्यासाठी विकासकामे करतो. दक्षिणेकडे मोफत वीज देतो. नुकसान किती आहे हे बघत नाही, असे गडकरी यांनी सांगितले.

प्रत्येक राज्यात रस्ते तयार होत आहेत...

यावर्षी ९ राज्यांत निवडणुका होत आहेत. निवडणुका आल्यानंतरच विविध प्रकल्प सुरू होतात, असं विरोधक म्हणतात. त्यावर गडकरींनी सविस्तरपणे उत्तर दिले. असं कोणतं राज्य आहे तिथे रस्ते तयार केले जात नाहीत. पंजाबपासून प्रत्येक राज्यात रस्ते होत आहेत. दिल्ली -चंदीगड मार्गावर उड्डाणपूल बांधलं जात आहे, असे ते म्हणाले.

मी टार्गेट निश्चित करतो...

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यावर्षी कोणतं लक्ष्य किंवा आश्वासने आहेत या प्रश्नावरही गडकरींनी उत्तर दिले. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विचार करत नाही. काम करत राहतो आणि काम करत राहायला हवे असे मला वाटते. हे माझं आश्वासन नाही, तर लक्ष्य आहे. २०२४ संपण्यापूर्वीच देशातील रोड इन्फ्रास्ट्रक्चर अमेरिकी स्टँडर्डचे असेल. बिहार-उत्तर प्रदेशापासून ते मेघालय-त्रिपुरापर्यंत... असे नितीन गडकरी यांनी ठामपणे सांगितले.

रस्त्यावर विमाने उतरतील...

मी मंत्री असताना सी प्लेन आणलं. म्हणजेच, धावपट्टीवरून उड्डाण भरून पाण्यावर उतरणारं विमान आणलं. हे धोरण सरकारनं फायनल केलं होतं. लेक, डॅम वॉटरपोर्ट उभारले जातील. २६ असे रस्ते आहेत, की तिथे विमानं उतरतील. जेव्हा कधी ट्रॅफिक कमी असेल, तेव्हा सर्वात आधी रेल्वे फाटकासारखे रस्ते बंद होतील आणि विमानं उतरवण्यात येतील, असे नितीन गडकरी म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com