Sonali Phogat Dies: टिकटॉक स्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगट (Sonali Phogat) यांचे गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) निधन झाले. त्यांचे भाऊ वतन ढाका यांनी याबाबत पुष्टी केली आहे. सोनाली यांच्या मृत्यूची माहिती मिळताच त्यांचे कुटुंबीय गोव्याला रवाना झाले आहे. निधनाच्या काही तासांअगोदरच त्यांनी त्याच्या इन्स्टाग्रामवर त्यांचे फोटोज शेयर केले होते, तसेच ट्विटरवरचा प्रोफाईल फोटोही बदलला होता. (Sonali Phogat Death News)
हे देखील पाहा -
सोनाली फोगाट यांना भारतीय जनता पक्षाने (BJP) सोनाली फोगाट यांना हरियाणा राज्यातील हिस्सार जिल्ह्याच्या आदमपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती, तरीही त्यांना निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते कुलदीप बिश्नोई हे यांच्या विरोधात सोनाली यांनी निवडणुक लढवली होती.
सोनाली यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात २००६ मध्ये अँकरिंगपासून केली होती. हिसार दूरदर्शनसाठी त्यांनी अँकरिंग केली होती. दोन वर्षांनंतर २००२८ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. २०१९ मध्ये त्यांनी भाजपच्या तिकिटावर आदमपूरमधून विधानसभा निवडणूक लढवली. सोनाली यांनी पंजाबी आणि हरियाणवी चित्रपट, म्युझिक व्हिडिओ केले होते. २०१९ मध्ये, त्यांनी चोरियां चोर से कम नहीं होती या चित्रपटात काम केले. हा त्यांचा पहिला चित्रपट होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.