Bihar Explainer : बिहारमध्ये आघाडीत बिघाडी? नितीश कुमार खरंच भाजपसोबत जाणार? लोकसभा निवडणुकीत होऊ शकतो हा फायदा

Bihar Political Crisis: राजकारणात काहीही होऊ शकते, असं म्हटलं जातं. याची प्रचिती बिहारमध्ये येत आहे. नितीश कुमार आज राजीनामा देणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नितीश कुमार यांच्या पलटी मारण्याच्या चर्चेमुळे दिल्लीपासून ते पाटणापर्यंत वातवरण तापलंय. बिहारमध्ये राजकीय होणारी उलथापालथ पाहता उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि सपाने संगम मत करण्याचा निर्णय घेतला.
Bihar Explainer :  बिहारमध्ये आघाडीत बिघाडी? नितीश कुमार खरंच भाजपसोबत जाणार? लोकसभा निवडणुकीत होऊ शकतो हा फायदा

Bihar Political Explainer :

बिहारमध्ये राजकीय होणारी उलथापालथ पाहता उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि सपाने संगम मत करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान गुण्यागोविंदाने राहणाऱ्या आरजेडी आणि जेडीयूचा संसार का तुटला हा प्रश्न अनेकांना पडलाय. कोणत्या कारणामुळे नितीश कुमार परत एकदा जुनी चाल खेळत पलटी मारत आहेत. तसेच ते परत -परत एनडीएसोबत का जातात? नितीश कुमारांना एनडीए लगेच का स्वीकारते, असे प्रश्न अनेकांना पडलेत. या प्रश्नांचे उत्तर आपण या लेखातून मिळवू. (Latest News)

सर्वात आधी आपण आरजेडी आणि जेडीयू यांची ताटातूट का झाली हो जाणून घेऊ. नरेंद्र मोदींच्या समोर मोठं आव्हान उभारण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी उभारली. या आघाडीचं नेतृत्त्व नितीश कुमार करत होते. परंतु आता नितीश कुमारच भाजपसोबत जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बिहारची सत्ता ठरली काडीमोडचं कारण

नितीश कुमार हे इंडिया आघाडीचं नेतृत्त्व करत होते. नितीश कुमार यांना इंडिया आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात उतरायचे होते. त्यामुळे लालू प्रसाद यादव हे नितीश कुमार यांना पाठिंबा देतील आणि काँग्रेसला हाताळतील. जेणेकरून नितीश कुमार हे इंडिया आघाडीचे नेते बनतील. ते काही होताना दिसत नव्हतं. त्याच दरम्यान नितीश कुमारांवर लालू प्रसाद यादव तेजस्वी यादवला मुख्यमंत्री बनावावे यासाठी दबाव टाकत होते. यामुळे त्यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचं म्हटलं जात होतं. त्याचदरम्यान इंडिया आघाडीत नितीश कुमार यांना समन्वयक होण्याची संधी न मिळाल्यानंतर नितीश कुमार यांना दुसरी मोठी जबाबदारी देखील मिळाली नाही. त्यात जागा वाटपाचा मार्ग देखील निघाला नाही.

पक्ष फुटीची भीती

एका बाजुला तेजस्वीला मुख्यमंत्री बनवण्यासाठी दबाव टाकला जात होता. तर दुसऱ्या बाजुला आरजेडीकडून जेडीयूमध्ये सुरुंग लावला जात असल्याची भीती नितीश कुमारांना होती. याच कारणामुळे त्यांनी ललन सिंह यांना पक्ष अध्यक्षांच्या पदावरून हटवलं. लाल प्रसाद यांच्या मुलीच्या विधानामुळे नितीश कुमार दुखावले असल्याचं देखील म्हटलं जात आहे. लालू यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी तीन ट्विट केले होते. त्यात त्यांनी नितीश यांचे नावही घेतले नसले तरी ट्विटची भाषा आणि त्यात वापरलेले शब्द पाहता ते नितीश कुमारांसाठीच बोलल्याचे स्पष्ट होते.

नितीश कुमार यांच्यासाठी एनडीए का असते तयार

बिहारमध्ये मागासवर्गीयांमध्ये नितीशकुमार यांना मोठा पाठिंबा आहे. यामुळे नितीश यांचा पाठिंबा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी फायदेशीर ठरू शकतो. नितीशकुमार आणि जेडीयूची हिंदुत्वविरोधी प्रतिमा नाही. भाजपप्रमाणेच नितीश कुमारही घराणेशाहीवर टीका करत असतात. जेडीयूचा पाठिंबा बिहार निवडणुकीत विजयाची गॅरंटी देणारा आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत २०१५ मध्ये महाआघाडीत JDU सोबत RJD आणि काँग्रेस होते. त्यावेळी याची लढत एनडीएशी होती. या निवडणुकात महाआघाडीने ७४ टक्के जागा जिंकल्या होत्या.

४ वर्षानंतर जेडीयू आणि भाजपने २०१९ ची लोकसभा निवडणूक एकत्र लढवली. तर राजद आरजेडी आणि काँग्रेसमध्ये युती होती. यामध्ये एनडीएने ९७ टक्क्यांहून अधिक जागा जिंकल्या होत्या. यानंतर बिहार विधानसभा निवडणुकीत २०२० मध्येही जेडीयू एनडीएमध्ये होती. त्यावेळी त्यांची लढत राजद आरजेडी आणि काँग्रेसशी होती. या निवडणुकीतही एनडीएने ५० टक्क्यांहून अधिक जागा जिंकल्या होत्या.

तर नितीश कुमार एनडीएमध्ये परतल्याने I.N.D.I.A. इंडिया आघाडीला मोठा धक्का बसेल. लोकसभेच्या निवडणुकीत एनडीए अधिक मजबूत होईल. नितीश कुमार यांच्या स्वच्छ प्रतिमेचा लाभ एनडीएला मिळेल. नितीशसोबतची युती तुटल्याने आरजेडीचे आव्हान वाढेल तसेच घराणेशाहीच्या राजकारणाला फटका बसेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com