Bihar Bridge collapses : बिहारच्या भागलपूरमध्ये दुसऱ्यांदा कोसळला निर्माणाधीन पूल! संपूर्ण घटना Video मध्ये कैद

Bhagalpur Bridge collapses : बिहारमधील भागलपूरमधील सुलतानगंज-अगुवानी गंगा नदीवरील निर्माणाधीन चौपदरी पूल पुन्हा एकदा कोसळला आहे.
Bihar Bhagalpur Bridge collapses
Bihar Bhagalpur Bridge collapsessaam tv

Bihar Bridge collapses Video : बिहारमधील भागलपूरमधील सुलतानगंज-अगुवानी गंगा नदीवरील निर्माणाधीन चौपदरी पूल पुन्हा एकदा कोसळला आहे. बांधकाम सुरू असलेल्या पुलाचा संपूर्ण ढाचा नदीत कोसळला. हा पुल कोसळतानाची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

आगवणी बाजूने खांब क्रमांक 10, 11, 12 वरील संपूर्ण सुपर स्ट्रक्चर कोसळले असून हा सुमारे 100 मीटरचा भाग असू शकतो असे सांगितले जात आहे. पुलाचे तीन खांबही नदीत बुडाले. मात्र पुलाचा ढाचा तुटण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या पुलाची किंमत सुमारे 1750 कोटी रुपये असून हा मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे.

Bihar Bhagalpur Bridge collapses
Chhagan Bhujbal News: भाकरी फिरवा पण कच्ची राहणार नाही याची काळजी घ्या; छगन भुजबळ स्पष्टच बोलले

एसपी सिंगला कंपनीतर्फे हा महासेतू बांधण्यात येत आहे. भागलपूर जिल्ह्यातील सुलतानगंजमध्ये बांधण्यात येत असलेला हा पूल खगरिया आणि भागलपूर जिल्ह्यांना जोडण्यासाठी बांधला जात आहे. ही घटना रविवारी सायंकाळची आहे. या घटनेनंतर बिहारचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणखी लांबणीवर पडला आहे. एसपी सिंगला कंपनीतर्फे हा महासेतू बांधण्यात येत आहे. हा पूल भ्रष्टाचाराचा बळी असल्याच आरोप केला जात आहे. याची चौकशी करण्याची घोषमा सरकार आणि विभागाकडून करण्यात आली आहे. (Breaking News)

Bihar Bhagalpur Bridge collapses
Sulochana Latkar Passed Away: ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर काळाच्या पडद्याआड, मराठी सिनेसृष्टी हळहळली

गेल्या वर्षीही पुलाचा कोसळळा होता पूल

गेल्यावर्षी २७ एप्रिल रोजी या निर्माणाधीन पुलाचे सुपर स्ट्रक्चर नदीत कोसळले होते. त्यावेळी जोरदार वादळी वारा आणि पावसात सुमारे 100 फूट लांबीचा भाग कोसळला होता. मात्र त्यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यानंतर पुन्हा पूल बांधणीचे काम सुरू झाले. यावेळी सुपर स्ट्रक्चरचे सुमारे 80 टक्के काम पूर्ण झाले होते. एवढेच नाही तर अप्रोच रोडचे ४५ टक्के कामही पूर्ण झाले होते. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com