CBSE Supplementary Exam 2023: CBSE मध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, पुन्हा परीक्षा देण्याची संधी

CBSE Supplementary Exam: अनेक वेळा खूप मेहनत करूनही विद्यार्थ्यांना परीक्षेत अपेक्षित गुण मिळत नाही. जर सीबीएसई बोर्डाच्या 10वी किंवा 12वीच्या परीक्षेतही तुमच्यासोबत असे घडले असेल, तर निराश होण्याची गरज नाही.
CBSE Supplementary Exam 2023
CBSE Supplementary Exam 2023Saam Tv

CBSE Supplementary Exam 2023 News: अनेक वेळा खूप मेहनत करूनही विद्यार्थ्यांना परीक्षेत अपेक्षित गुण मिळत नाही. जर सीबीएसई बोर्डाच्या 10वी किंवा 12वीच्या परीक्षेतही तुमच्यासोबत असे घडले असेल, तर निराश होण्याची गरज नाही.

पुरवणी परीक्षा देऊन तुम्ही पुन्हा एकदा सीबीएसई बोर्डाच्या 10वी किंवा 12वीत चांगले गुण मिळवू शकता. CBSE बोर्डाच्या पुरवणी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना www.cbse.gov.in या संकेतस्थळावर जाऊन फॉर्म भरावा लागणार आहे. 1 जूनपासून पुरवणी परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करणार आहे. (Latest Marathi News)

CBSE Supplementary Exam 2023
Solapur Crime News: आधी बायकोची हत्या, मग स्वतः उचललं टोकाचं पाऊल; सोलापुरातील धक्कादायक घटना

CBSE पुरवणी परीक्षा 2023 कोण देऊ शकेल?

सीबीएसई बोर्डाच्या (CBSE)10वी, 12 वी 2023 च्या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले आहेत किंवा एक, दोन विषयात अनुत्तीर्ण झाले आहेत ते पुरवणी परीक्षा देऊ शकतात. 1 जून ते 15 जून 2023 दरम्यान विध्यार्थी पुरवणी परीक्षा 2023 मध्ये बसण्यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जून

सीबीएसईची पुरवणी परीक्षा जुलै 2023 रोजी घेतली जाईल. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 15 जून 2023 असेल. भारतातील विद्यार्थ्यांना अर्ज फी म्हणून प्रतिविषय 300 रुपये द्यावे लागणार आहेत. तर नेपाळमधील विद्यार्थ्यांना 1000 रुपये आणि भारताबाहेरील विद्यार्थ्यांना 2000 रुपये प्रतिविषय भरावे लागतील. जे विद्यार्थी 15 जूनपर्यंत अर्ज करू शकले नाहीत, त्यांना 300 रुपये विलंब शुल्कासह 16 ते 17 जूनपर्यंत अर्ज करता येणार आहेत. (Exam)

CBSE Supplementary Exam 2023
Education Loan: CIBIL Score कमी आहे म्हणून शैक्षणिक कर्ज नाकारता येणार नाही; हायकोर्टाचे महत्वाचे निर्देश

परीक्षा कधी होणार?

जे विद्यार्थी नापास झाले आहेत. त्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी जुलै महिन्यातच पुरवणी परीक्षा घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीपासून सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणारी पुरवणी परीक्षा आता जुलैमध्येच घेण्यात येणार आहे. तसेच पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या कालावधीत कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

अर्ज कसा करावा?

अधिकृत वेबसाइट- cbse.nic.in ला भेट द्या.

मुख्यपृष्ठावर, CBSE 12वी कंपार्टमेंट परीक्षा 2023 साठी लिंकवर क्लिक करा.

हार्ड कॉपी डाउनलोड करा.

आता शाळा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार अर्ज भरावा लागेल.

फॉर्म सबमिट करा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com