Bharat Bandh Maharashtra impact Latest News : केंद्र सरकारच्या नव्या कामगार कायद्याच्या विरोधात (labour law protest India) देशातील १० प्रमुख कामगार संघटना आणि शेतकरी संघटकांनी आज देशव्यापी भारत बंदची हाक दिली होती. याला महाराष्ट्रातील काही संघटनांनीही पाठिंबा दिला होता. भारत बंदचा महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात परिणाम दिसून आला. काही जिल्ह्यात एसटी बसेच्या सेवांवर (ST bus services disrupted) परिणाम झाला होता. तर बँकिंगची सेवाही विस्कळीत (bank strike Maharashtra) झाली होती. राज्यातील अनेक बाजारपेठात शुकशुकाट होता. पाहूयात महाराष्ट्रावर नेमका काय परिणाम झाला..(Maharashtra strike news)
भारत बंदचा फटका महाराष्ट्रात सर्वाधिक बँकिग क्षेत्राला बसणार आहे. 'ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन' (AIBEA) सह अनेक संघटनांनी आजच्या संपात सहभाग घेतला. त्यामुळे सरकारी बँकांमधील कामकाज, चेक क्लिअरन्स आणि रोख व्यवहार विस्कळीत झाले. UPI, नेट बँकिंग आणि ATM सेवा सुरळीत असल्यामुळे थोडा दिलासा मिळाला.
भारत बंदला महाराष्ट्रातील 'संयुक्त कृती समिती'ने पाठिंबा दिला होता. त्याचा फटका एसटी बसेसच्या सेवांवर झालाय. काही जिल्ह्यांत एसटी बसच्या फेऱ्या कमी झाल्याचे दिसले. तर मायानगर मुंबईतील बेस्ट (BEST) आणि पुण्यात पीएमपीएल (PMPML) सेवा अंशतः सुरू आहेत. लोकल ट्रेन्स आणि मेट्रो सेवांवर जास्त परिणाम झालेला नाही. पण लोकल उशीराने धावत आहेत.
नवी मुंबईतील वाशी एपीएमसी मार्केटमधील कामगारांनी आजच्या भारत बंदमध्ये सहभाग घेतला होता. त्याचा परिणाम झाल्याचे दिसतेय. कामगारांच्या सहभागामुळे एपीएमसी मार्केटमध्ये आवक काही प्रमाणात मंदावल्याचे चित्र होते. रुग्णालय, रुग्णवाहिका, औषध दुकाने, दूध पुरवठा आणि अग्निशमन दल यांसारख्या अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरू होत्या.
विविध मागण्यांसाठी अमरावती जिल्ह्यातील हजारो कामगार उतरले रस्त्यावर उतरले होते. इर्विन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हजारो लोक रस्त्यावर उतरले होते. मोर्चात जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, आशा सेविकाही सहभागी झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर हा मोठा मोर्चा अमरावतीत निघाला होता. यावेळी कामगारांकडून विविध मागण्यांसाठी जोरदार घोषणा देण्यात आल्या
अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघ व महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ तर्फे जळगावमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काम बंद आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणा देत तीव्र निदर्शने करण्यात आले. पीएफआरडी कायदा रद्द करून जुनी पेंन्शन योजना लागू करा. तथा फंड मॅनेजरकडे संचित झालेली रक्कम संबंधित राज्य सरकारला परत करण्यात यावी, यासारख्या मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांकडून संप पुकारण्यात आलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.