Health Alert: सावधान! तुम्ही खाताय प्लास्टिकची इडली? दीर्घकाळ सेवन केल्यास कर्करोगाचा धोका

Idli Can Be Cancerous: इडलीमध्ये कर्करोगकारक घटक आढळल्याने चिंता वाढली. कर्नाटकातील काही नमुने चाचणीत अपयशी ठरले, ज्यामुळे इडली प्रेमींना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
Idli Can Be Cancerous
Idli Can Be CancerousFreepik
Published On

इडली-डोसा हे दक्षिण भारतीय खाद्यसंस्कृतीतील लोकप्रिय पदार्थ असून भारतभर याचा मोठ्या प्रमाणावर आस्वाद घेतला जातो. मात्र इडलीसंबंधित एक धक्कादायक बाब समोर आली आहे. बेंगळुरूमधील अन्न सुरक्षा विभागाने इडलीच्या पिठाचे काही नमुने तपासले असता त्यात कर्करोगजन्य रसायने असल्याचे उघड झाले. या घटनेमुळे इडलीप्रेमींमध्ये चिंता वाढली आहे.

अनेक शहरांमध्ये सहज मिळणाऱ्या या पदार्थात आरोग्यास हानीकारक घटक असल्याने नागरिकांना अधिक सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अन्न सुरक्षा विभागाने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, अशा प्रकारच्या पदार्थांचे सेवन करण्यापूर्वी नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

Idli Can Be Cancerous
Health: दररोज एक तासापेक्षा जास्त वेळ मोबाईल पाहत असाल तर सावधगिरी बाळगा

मिडिया रिपोर्टनुसार, बेंगळुरुमध्ये अन्न सुरक्षा विभागाने घेतलेल्या चाचण्यांमध्ये धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. रस्त्यावरील विक्रेते, हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये घेतलेल्या ५०० हून अधिक इडलीच्या नमुन्यांपैकी ३५ पेक्षा जास्त नमुने अपयशी ठरले. तपासात इडली बनवण्यासाठी वापरलेला तांदूळ आणि उडीद डाळ भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाची असल्याचे आढळले. तसेच इडलीला पांढरा रंग देण्यासाठी ब्लीचिंग पावडर आणि कृत्रिम रसायनांचा वापर केला जात असल्याने आरोग्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

ही रसायने अन्नासोबत शरीरात पोहोचतात आणि हळूहळू गंभीर नुकसान पोहोचवतात. पूर्वी इडली तयार करताना सुती कापडाचा वापर केला जात होता, पण आता प्लास्टिकचा वापर वाढला आहे. प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये पॅक करून गरम केल्यास ते विषारी रसायने सोडते, ज्यामुळे कर्करोगासह गंभीर आजारांचा धोका वाढतो. आरोग्यास हानिकारक हा प्रकार रोखण्यासाठी अधिक सतर्कता बाळगण्याची गरज आहे.

या घटनेनंतर इडली खाणाऱ्या नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते दीर्घकाळ शरीरात जाणारी रसायने कर्करोगास कारणीभूत ठरू शकतात. प्लास्टिकमध्ये तयार आणि साठवलेली इडली आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. त्यामुळे सुरक्षिततेसाठी घरातून प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर टाळण्याचा सल्ला दिला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com