Bathinda Military Station Firing : 4 सहकाऱ्यांवर गोळ्या झाडणाऱ्या जवानाने दिलेली कबुली धक्कादायक, रायफल चोरली अन्...

Latest Breaking News: याप्रकरणी पंजाब पोलिसांनी मोहन देसाई नावाच्या जवानाला अटक केली आहे.
Bathinda Military Station Firing
Bathinda Military Station FiringSaam Tv
Published On

Punjab News: पंजाबच्या बठिंडा मिलिट्री स्टेशमध्ये (Bathinda Military Station) गोळीबार करत चार जवानांची हत्या करण्यात आली होती. या हल्लेखोराला पकडण्यात पंजाब पोलिसांना (Punjab Police) यश आले आहे. या जवानांची हत्या करणारा व्यक्ती हा दुसरा तिसरो कोणी नसून जवानच आहे.

याप्रकरणी पंजाब पोलिसांनी मोहन देसाई नावाच्या जवानाला अटक केली आहे. आरोपी जवान हा याप्रकरणातला प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता. या तपासादरम्यान पोलिसांना त्याच्यावर संशय आला. या जवानाची कसून चौकशी केल्यानंतर त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

Bathinda Military Station Firing
Maharashtra Political News: 'चांगला कष्ट करणारा नेता...'; अजित पवार आणि अमित शहांच्या भेटीच्या चर्चेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

बठिंडाचे एसएसपी गुलनीत खुराणा यांनी सांगितले की, घटनेतील प्रत्यक्षदर्शीला हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. आरोपी जवान मोहन देसाईची रात्री उशिरापर्यंत बठिंडा पोलिसांनी चौकशी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'मोहन देसाईने आपल्या जबानीत सांगितले की, चार जवान त्याच्यावर लैंगिक अत्याचार करायचे, याला कंटाळून त्याने चौघांची हत्या केली.'

बठिंडा मिलिट्री स्टेशनमध्ये बुधवारी पहाटे साडेचारच्या सुमारास 4 जवानांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. घटनेच्या वेळी हे सर्व जवान स्टेशनवरील त्यांच्या बॅरेकमध्ये झोपले होते. या गोळीबारामध्ये गनर्स सागर बने, कर्नलेश आर, योगेश कुमार जे आणि संतोष एम नागराल यांचा मृत्यू झाला. या सर्वांचे वय 24 ते 25 वर्षे दरम्यान होते. पोलिसांनी घटनास्थळावरून शस्त्र जप्त केले होते.

त्याचवेळी या घटनेचा प्रत्यक्षदर्शी म्हणजे मोहन देसाई याने पोलिसांना सांगितले होते की, त्याने हल्लेखोरांना इन्सास रायफल आणि कुऱ्हाडीसह पाहिले होते. हल्लोखोरांनी कुर्ता पायजमा घातल्याचे त्याने सांगितले होते. त्यानंतर पोलिसांनी बठिंडा कॅन्टोन्मेंट पोलिस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरोधात आयपीसी कलम 302 (खून) आणि शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आणि शोध सुरु केला. या घटनेचा तपास करत असताना पोलिसांना मोहन देसाईवर संशय आला. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर रविवारी रात्री उशिरा पोलिसांनी त्याला अटक केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com