महिला कॉन्स्टेबलला शिपाई नवऱ्यानंच संपवलं, शेतात नेत डोक्यात घातला रॉड; कारण..

Husband Kills Woman Cop: बाराबंकीच्या मसौली परिसरात महिला कॉन्स्टेबलचा मृतदेह सापडला. तिच्या पतीनेच, जो स्वतः शिपाई आहे, तिची हत्या केल्याचे निष्पन्न.
Husband Kills Woman Cop
Husband Kills Woman CopSaam Tv News
Published On
Summary
  • बाराबंकीच्या मसौली परिसरात महिला कॉन्स्टेबलचा मृतदेह सापडला.

  • तिच्या पतीनेच, जो स्वतः शिपाई आहे, तिची हत्या केल्याचे निष्पन्न.

  • लोखंडी रॉडने डोक्यावर वार करून शेतात हत्या करण्यात आली.

  • पोलिसांनी आरोपीला अटक करून हत्या प्रकरण उघड केले.

बाराबंकी मसौली पोलीस स्टेशन परिसरातील महिला कॉन्स्टेबल विमलेश पाल यांचा संशयास्पद मृतदेह आढळला. मात्र, पोलिसांनी तपास करीत गुन्ह्याचा छडा लावला. महिला कॉन्स्टेबलच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मृत महिलेचा पती पोलीस कर्मचारी इंद्रेश मौर्य याला अटक करून तुरूंगात धाडले आहे. गुरूवारी दुपारच्या सुमारास मसौली पोलीस स्टेशन परिसरातील भायरा रोड येथील प्लायवुड फॅक्टरीजवळून त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी या प्रकरणात हत्येत वापरलेली लोखंडी रॉड, मृताची पर्स आणि कार जप्त करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २०१७ सालापासून मृत महिलेचे शिपाईसोबत प्रेमसंबंध होते. लग्नानंतर आरोपी मृत महिलेला पत्नीचा दर्जा देत नव्हता. दोघांमध्ये अनेकदा वादविवाद झाले. कर्ज घेऊन त्यानं पत्नीच्या खात्यातून अनेकदा परस्पर पैसेही काढले होते.

Husband Kills Woman Cop
Gold Price: सोन्याचा भाव घसरला! महिन्याच्या दुसऱ्याच दिवशी खरेदीदारांना दिलासा; वाचा लेटेस्ट दर

घटनेच्या दिवशी आरोपी कार घेऊन लखनऊहून मसौलीच्या दिशेनं आला. विमलेश ड्युटीवर जात असताना वाटेत त्यांना थांबवलं. नंतर त्यांना कारमध्ये बसवून शेतात नेलं. शेतात उतरताच आरोपीनं महिला कॉन्स्टेबलच्या डोक्यात रॉड घातला. यात ते रक्तबंबाळ होऊन खाली कोसळल्या. रक्त जास्त प्रमाणात वाहिल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपी कारनं लखनऊमार्गे सुलतानपूरच्या दिशेनं पळून गेला.

Husband Kills Woman Cop
मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटातील नेत्यानं उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरात आयुष्य संपवलं

त्यानं लखनऊमध्येच एका खोलीत त्याचा मोबाईल सोडून पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवलं. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपीला ताब्यात घेतले असून, त्यानं हत्या करण्यासाठी वापरलेली शस्त्र देखील जप्त केली आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

Husband Kills Woman Cop
तेजस ठाकरेंचं शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; राजकीय वर्तुळात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com