Bank Holidays: पुढील महिन्यात एकूण 13 दिवस बँका बंद; सुट्ट्यांची संपूर्ण यादी येथे पहा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने मार्च 2022 मधील बँक सुट्ट्यांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्याची सुरुवात उद्या १ मार्चपासून महाशिवरात्री उत्सवाने होणार आहे.
Bank Holidays
Bank HolidaysSaam Tv
Published On

नवी दिल्ली - डिजिटल बँकिंगमुळे तुमचे व्यवहार सोपे झाले आहेत. पण अजूनही अशी अनेक कामे आहेत ज्यासाठी बँकेच्या शाखेत जाणे आवश्यक आहे. त्यामुळे बँक (Bank) कोणत्या दिवशी बंद राहणार आणि कोणत्या दिवशी उघडणार हे ग्राहकांना माहीत असणे गरजेचे आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने मार्च 2022 मधील बँक सुट्ट्यांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्याची सुरुवात उद्या १ मार्चपासून महाशिवरात्री उत्सवाने होणार आहे. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, मार्च 2022 मध्ये सण आणि इतर विशेष प्रसंगी, विविध झोनमध्ये एकूण 7 दिवस बँका बंद राहतील. याशिवाय प्रत्येक महिन्याच्या रविवारी आणि दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद राहतील.

हे देखील पहा -

सुट्ट्यांची संपूर्ण यादी येथे पहा -

1 मार्च: महाशिवरात्रीनिमित्त कानपूर, जयपूर, लखनौ, रांची, श्रीनगर, तिरुवनंतपुरमसह देशातील जवळपास सर्व प्रमुख शहरांमध्ये बँका बंद राहणार आहेत.

३ मार्च: गंगटोकमध्ये लोसारच्या निमित्ताने बँकेला सुट्टी असेल.

4 मार्च: चपचार कुट निमित्त आयझॉलमध्ये बँका बंद राहतील.

6 मार्च : रविवारची सुट्टी.

12 मार्च: महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने सुट्टी.

13 मार्च: रविवारची सुट्टी.

Bank Holidays
वर्ध्यात तरुणाईची झिंगाट दारु पार्टी; आयोजकासह फार्म मालकास अटक

17 मार्च: होळी निमित्त लखनऊ, कानपूर, देहरादून आणि रांची झोनमध्ये सुट्टी असेल.

18 मार्च: होळी/डोल जत्रेच्या निमित्ताने कोलकाता, बंगलोर, भुवनेश्वर, कोची, चेन्नई, इम्फाळ आणि तिरुवनंतपुरम वगळता इतर सर्व झोनमध्ये सुट्टी असेल.

19 मार्च: होळी/याओसांगच्या निमित्ताने भुवनेश्वर, इम्फाळ आणि पाटणा येथे सुट्टी असेल.

20 मार्च: रविवारची सुट्टी.

22 मार्च: बिहार दिनानिमित्त पाटणा झोनमध्ये सुट्टी.

26 मार्च : महिन्याचा चौथा शनिवार असल्याने सुट्टी असेल.

27 मार्च : रविवारी सुट्टी असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com